गेल्या आठ दिवसांपासून सुनील शिरोरे यांना वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरावर शोककळा पसरली. कळवण शहरातील व तालुक्यातील विविध धार्मिक संस्थान, सहकारी संस्था उभारणीत सुनील शिरोरे यांचा सिंहाचा वाटा होता. सन २०१० मध्ये शिरोरे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने कमको बँकेवर सत्ता काबीज केली होती. याशिवाय, कळवण शहराचे ग्रामदैवत श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष, कळवण लाडशाखीय वाणीसमाज मंगल कार्यालयाचे माजी अध्यक्ष, कमको बँकेचे माजी अध्यक्ष, श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवाच्या आयोजनात प्रमुख मार्गदर्शक यासह तालुक्यातील व जिल्ह्यातील विविध संस्थांवर त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, तीन भाऊ व बहीण असा परिवार आहे.
कळवण तालुक्यातील उद्योजक सुनील शिरोरे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 8:28 PM