शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

दरवाढीविरुद्ध उद्योजकांचे ऊर्जामंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 11:04 PM

मंदीचा सामना करता करता नाकीनव आलेल्या उद्योजक, व्यापाऱ्यांना पुन्हा वीज दरवाढीचा दणका देण्याचा प्रयत्न चालविला असून, ही प्रस्तावित दरवाढ मागे घेण्यात यावी यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महाराष्ट्र चेंबरच्या प्रतिनिधींनी ऊर्जामंत्र्यांना साकडे घातले आहे.

ठळक मुद्देमागण्यांबाबत सकारात्मक । उद्योग बंद पडण्याची भीती

सातपूर : मंदीचा सामना करता करता नाकीनव आलेल्या उद्योजक, व्यापाऱ्यांना पुन्हा वीज दरवाढीचा दणका देण्याचा प्रयत्न चालविला असून, ही प्रस्तावित दरवाढ मागे घेण्यात यावी यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महाराष्ट्र चेंबरच्या प्रतिनिधींनी ऊर्जामंत्र्यांना साकडे घातले आहे.महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महाराष्ट्र चेंबरच्या प्रतिनिधींनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महावितरण कंपनीचे चेअरमन असीमकुमार गुप्ता यांची भेट घेऊन कैफियत मांडली. राज्यात सातत्याने औद्योगिक, व्यापारी व घरगुती वीज दरवाढीचा परिणाम नवीन गुंतवणुकीवर होत आहे आणि मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर करणारे उद्योग राज्याबाहेर जात आहेत. महावितरणने पुनश्च वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे उद्योजक, व्यापाऱ्यांची सहनशीलता संपत चालली आहे. हा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी क्रॉस सबसिडी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वीज वितरण कंपनी शासनाची दिशाभूल करत असल्याचे निदर्शनास आणून दिले.चेंबरच्या ऊर्जा समितीचे चेअरमन मिलिंद राजपूत यांनीही समस्या मांडली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार शिरीष चौधरी, अनिल गचके, डॉ. एस. एस. पाटील, भरत अग्रवाल, सुरेश चौहान, संजय शेटे, अमित हुक्केरीकर आदी उपस्थित होते.राज्याचे वीजदर कमी असावेत ही प्रामाणिक इच्छा आहे. परंतु महावितरणचे तत्कालीन चेअरमन संजीवकुमार यांनी ऊर्जामंत्र्यांना विश्वासात न घेता परस्पर वीज नियामक आयोगाकडे वीजदर प्रस्ताव सादर केला आणि वीज नियामक आयोगाने सुनावणींचा कार्यक्रम आखल्यामुळे सदर प्रस्ताव शासनास परत घेणे अथवा दुरुस्ती करणे शक्य नाही. मात्र व्यापारी उद्योजकांनी अभ्यासपूर्वक विरोध नोंदवावा. तसेच वीजदर कमी करण्यासाठी जनसामान्यातून काही अभ्यासपूर्वक सूचना असल्यास ऊर्जा खाते त्याचे स्वागत करेल आणि वीजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीministerमंत्री