शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

नाशिक शहरात स्मार्ट सिटी अभियानात सीएसआर अंतर्गत उपक्रमांसाठी उद्योजकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 3:45 PM

स्मार्ट सिटी : शिवाजी उद्यानाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव

ठळक मुद्देकंपनीकडे आतापर्यंत केंद्र व राज्य सरकार आणि महापालिका यांच्याकडून सुमारे ३८३ कोटी रुपये अनुदान प्राप्त शिवाजी उद्यानाच्या पुनर्विकासाठी आरसेलर या युनाटडेड किंगडममधील कंपनी तसेच मित्तल या भारतीय कंपनीने संयुक्तरित्या प्रस्ताव महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीकडे दिलेला असून त्याबाबत विचार सुरू

नाशिक - स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन झालेल्या कंपनीमार्फत विविध प्रकल्प राबविण्यास सुरुवात झालेली असतानाच सीएसआर अंतर्गतही काही संस्था, उद्योजक यांनी उपक्रम राबविण्यासाठी उत्सुकता दाखविली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले आणि सर्वात जुने असलेल्या शिवाजी उद्यानाच्या पुनर्विकासासाठी आरसेलर-मित्तल ही कंपनी पुढे आली असून तसा प्रस्ताव कंपनीला देण्यात आल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी दिली.स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची स्थापना झालेली आहे. कंपनीकडे आतापर्यंत केंद्र व राज्य सरकार आणि महापालिका यांच्याकडून सुमारे ३८३ कोटी रुपये अनुदान प्राप्त झालेले आहे. कंपनीने स्मार्ट सिटी अभियानांतर्गत रेट्रोफिटींग अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालन आणि नेहरु उद्यानाच्या पुनर्विकासाची कामे हाती घेतली असून मार्च २०१८ अखेर ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. याशिवाय, कंपनीने अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या १.१ कि.मी. मार्गावर स्मार्ट रोड साकारण्यासाठीही निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. एकीकडे कंपनीमार्फत प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असतानाच काही शिक्षण संस्था, उद्योजक, कारखानदारही सीएसआर अंतर्गत उपक्रम राबविण्यासाठी पुढे आले आहेत. त्यात प्रामुख्याने, शहरातील सर्वात जुन्या आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी उद्यानाचा समावेश आहे. शिवाजी उद्यानाच्या पुनर्विकासाठी आरसेलर या युनाटडेड किंगडममधील कंपनी तसेच मित्तल या भारतीय कंपनीने संयुक्तरित्या प्रस्ताव महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीकडे दिलेला असून त्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती थविल यांनी दिली. याशिवाय, अशोकस्तंभ येथील वाहतूक बेट सुशोभिकरणासाठी संदीप फाऊण्डेशन, सीबीएस येथील चौक सुशोभिकरणासाठी नाशिक फर्स्ट तर त्र्यंबकनाका येथील चौक सुशोभिकरणासाठी विंचूरकर डायग्नोस्टिक यांनी उत्सुकता दाखविली आहे. त्याबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचीही माहिती थविल यांनी दिली.योगदान देण्यास उत्सुकनाशिक महापालिकेने गेल्या पंचवार्षिकमध्ये मनसेच्या सत्ताकाळात सीएसआर अंतर्गत नेहरु उद्यानात वनौषधी उद्यान, ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, होळकर पुलावर वॉटर कर्टन, संगीत कारंजा, उड्डाणपुलाखाली सुशोभिकरण तसेच बाळासाहेब ठाकरे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय हे उपक्रम साकारले आहेत. सिंहस्थ कुंभमेळा काळातही अनेक वाहतूक बेटांचे सुशोभिकरण सीएसआर अंतर्गत झालेले आहे. शहराचा बदलणारा चेहरामोहरा पाहता आणखीही उद्योजक, कारखानदार, बॅँका सीएसआर अंतर्गत आपले योगदान देण्यास उत्सुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका