शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

माळेगाव औद्योगिक वसाहतीत उद्योजकांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 3:43 PM

सिन्नर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षितता ठेवणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी केले. माळेगाव औद्योगिक वसाहतीत निमाच्या कार्यालयात आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देअधिकारी नितीन गवळी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षितता ठेवणे महत्वाचे

सिन्नर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षितता ठेवणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी केले. माळेगाव औद्योगिक वसाहतीत निमाच्या कार्यालयात आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपिठावर प्रांतधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोहन बच्छाव, निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष सुधीर बडगुजर, सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन पंडीत लोंढे आदी उपस्थित होते.संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनलॉक नंतर नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना गेल्या काही दिवसापासून सिन्नर तालुक्यातही कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढली आहे, सिन्नर तालुक्यात दोन औद्योगीक वसाहती असून या दोन्ही वसाहतीत 20 ते 25000 कामगार रोजगाराच्या दृष्टीने काम करण्यात येत असतात तसेच अनेक मल्टिनॅशनल ग्रुपचे अधिकारी हे नाशिक येथून येत असतात. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची जास्त शक्यता असल्याने या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी व कामगारांची सर्वाधिक सुरक्षितता घेणे महत्वाचे असल्याचे गवळी यांनी सांगितले. याच बरोबर ज्या कंपन्यांमध्ये दोन अथवा तीन शिफ्ट सुरु आहे अशा ठिकाणी कामगारांना येण्या-जाण्यासाठी किमान अर्धा तासाचा वेळ ठेवणे महत्वाचे आहे या अर्ध्या तासात कामगार ज्या ठिकाणी काम करत होते त्याठिकाणी संपूर्ण सॅनिटाईझ करूनच नवीन कामगारांना कंपनीत प्रवेश दिला पाहिजे तसेच कंपनीच्या प्रवेशद्वारावर कामगाराना सॅनिटाईझ, ऑक्सिमिटरद्वारे तपासूनच प्रवेश द्यावा अशा सुचनाही त्यांनी केल्या.औद्योगिक क्षेत्रात महत्वाचा दुवा म्हणजे कामगार आहे तो जास्तीत जास्त वेळ हा आपल्या कामावर देत असल्याने त्याची काळजी कंपनीने घेतली पाहिजे, ज्या कंपनीचा कामगार हा दोन ते तीन दिवसापासून गैरहजर आहे त्याची संपूर्ण हिस्ट्री घेतल्याशिवाय त्याला कामावर घेऊ नये, तसेच कंपनीत सर्वानी मास्क वापरणे महत्वाचे, कोणीही आपले मास्क इतरांशी बोलताना काढून बोलू नये, मास्क अटकून न ठेवता ते नियमित नाकाला चांगल्या प्रकारे लावणे गरजेचे असल्याचे या वेळी प्रांतधिकारी अर्चना पठारे यांनी सांगितले तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करताना जवळपास 6 फूट इतके अंतर ठेवणे महत्वाचे आहे, कोणतेही वाहन आणत असतील तर ते वाहन संपूर्ण सॅनिटाईझ करूनच पार्किंग झोनमध्ये लावावे अशा सूचनाही पठारे यांनी केल्या.तहसीलदार राहुल कोताडे यांनी सिन्नर येथे नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या रुग्णालयासाठी औद्योगिक वसाहतीकडून जी मदत होत आहे त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचलन अतुल अग्रवाल व आभार प्रदर्शन सुधीर बडगुजर यांनी केले. याप्रसंगी निमा हाऊस उपसमितीचे अध्यक्ष राहुल नवले, ऊर्जा उपसमितीचे अध्यक्ष बबन वाजे, सेमिनार अँड वर्कशॉप उपसमितीचे अध्यक्ष एम.जी कुलकणी, सिन्नर उपसमितीचे अध्यक्ष अरुण चव्हाणके, रेक्रेशन उपसमितीचे अध्यक्ष रतन पडवळ, स्टाईसच्या व्हा. चेअरमन सौ. मीनाक्षी दळवी, संचालक सुनील कुंदे, व्यवस्थापक कमलाकर पोटे, दत्ता ढोबळे, बापू गावंड, सुहास काळे, राहुल शुक्ला, विशाल कुलकर्णी, सुधीर जोशी आदींसह उद्योजक, प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :MIDCएमआयडीसीsinnar-acसिन्नर