मालेगाव : बंदी उरली नावापुरतीचअस्ताणे : मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या आणि प्लॅस्टिक पत्रावळी, प्लॅस्टिक ग्लास यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून चाराटंचाई असल्याने मोकळी जनावरे प्लॅस्टिक पिशव्या आणि पत्रावळी खात असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे.मालेगाव तालुक्यातील गावांमध्ये गरीब व बेरोजगार तरुण, महिला पर्यावरण संवर्धनासाठी प्लॅस्टिक कागदी पिशव्या, बॉटल, ग्लास घेऊन ते प्रदूषण रोखण्याचे काम करीत आहेत. प्लॅस्टिक पिशवी वापरास बंदी घालण्यात आली आहे; परंतु ही बंदी नावापुरतीच आहे. प्लॅस्टिकबंदी असूनही मालेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात, शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा व्यापार सुरू आहे. त्यामुळे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत प्लॅस्टिक पिशवीचा वापर होत आहे. बाजार दुकानात कोणतीही वस्तू घेतली की प्लॅस्टिक पिशवीतच दिली जाते. प्रत्येक वस्तूबरोबर प्लॅस्टिक पिशवी मिळत असते. अशी वस्तू घरी आणल्यानंतर तसेच प्लॅस्टिक पिशवी फेकून दिली जाते. मग या पिशव्या गटारीत उघड्यावर शेतात, मैदानात अशा विविध ठिकाणी पडल्याने पर्यावरण बिघडत असते; परंतु मालेगाव शहरात गरीब व बेरोजगार मुले, महिला तसेच चिमुकले हातही प्लॅस्टिक पिशव्या ते भर उन्हात म्हणजे ४१ ते ४२ तापमानामध्ये गोळा करताना दिसत आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.तालुक्यात तसेच ग्रामीण भागात यावर्षी भीषण चाराटंचाई असल्याने जनावरे प्लॅस्टिक पिशव्याही खाताना दिसत आहेत. गावांमध्ये लस समारंभ किंवा अन्य कार्यक्रमानिमित्त जेवण दिले जाते. अशा जेवणाच्या कार्यक्रमात आधी झाडाच्या पाणाची पत्रावळी असायच्या; परंतु आता त्या पत्रावळीची जागा प्लॅस्टिक पत्रावळीने घेतली आहे.झाडपानाच्या पत्रावळीमुळे काही लोकांना रोजगार उपलब्ध होत असे; परंतु आता प्लॅस्टिक पत्रावळ्या बाजारात मिळत असल्याने या झाडांच्या पानांपासून बनलेल्या पत्रावळी नामशेष झाल्या आहे. गेल्या वर्षापासून प्लॅस्टिकबंदी केल्यामुळे पत्रावळीमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. आता पत्रावळी ही बारीक पुठ्ठ्याची बनवून तिच्यावर प्लॅस्टिक कागद लावलेला असतो. त्यामुळे ती अशी दिसते की कागदाची पत्रावळी आहे; परंतु त्या पत्रावळीला प्लॅस्टिक कागद लावलेला आहे. पिशव्यांचा सर्रास वापरमालेगाव शहरात गरीब व बेरोजगार मुले, महिला तसेच चिमुकले हातही प्लॅस्टिक पिशव्या गोळा करताना दिसतात. ते खेड्या-खेड्यांमध्ये जाऊन तेथील नागरिकांना एक प्रकारे ते प्लॅस्टिक पिशव्या, चपला, प्लॅस्टिक गोण्या, प्लॅस्टिक बाटल्या अशा वस्तू दिवसभर जमा करतात. यामुळे जनावरांचे प्राण वाचण्यास मदत होत आहे. प्लॅस्टिकबंदी केल्यामुळे थोड्या फार प्रमाणात प्लॅस्टिक पिशवी बंद झाली होती; परंतु आता पुन्हा सुरू झाली आहे.
ंप्लॅस्टिकमुळे पर्यावरण धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 12:31 AM
मालेगाव : बंदी उरली नावापुरतीचअस्ताणे : मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या आणि प्लॅस्टिक पत्रावळी, प्लॅस्टिक ग्लास यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून चाराटंचाई असल्याने मोकळी जनावरे प्लॅस्टिक पिशव्या आणि पत्रावळी खात असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे.
ठळक मुद्देपत्रावळीची जागा प्लॅस्टिक पत्रावळीने घेतली आहे.