मानोरी : येवला तालुक्यातील खडकीमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने शनिवारी (दि.१३) आषाढी वारीतून वृक्षारोपण लागवड करून जनजगृती करण्यासाठी खडकीमाळ येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली.वृक्ष दिंडी सोहळ्यादरम्यान रिंगण सोहळा पार पडला. तसेच त्या ठिकाणी बाल विठ्ठल-रुक्मिणीची वेशभूषा केलेल्या विद्याथ्यांची औक्षण करून आरती घेण्यात आली. यावेळी महिला, मुली, पालक फुगड्या खेळण्यात आले. यावेळी वृक्ष दिंडी साठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, भाविक, महिला, विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. झाडे लावा झाडे जगवाचा जयघोष करत झाडे जोपासण्याचा संदेश देण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक गेनसिद्ध शिवगोंडे, रघुवीर चव्हाण, सुलभा हापसे, अंगणवाडी सेविका वर्षा साठे, बाबुराव शेळके, पुंजहारी शेळके, रामदास शेळके, राजेंद्र शेळके, यादव शेळके, साहेबराव शेळके, बाजीराव शेळके, भागवत गाडेकर, विठ्ठल शेळके, रोहिदास आहेर, गोकुळ शेळके, ज्ञानेश्वर शेळके, दगुबाई शेळके, पल्लवी शेळके, सोनाली शेळके आदी उपस्थित होते.
खडकीमाळ येथे वृक्षदिंडीतुन पर्यावरणाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 7:54 PM
मानोरी : येवला तालुक्यातील खडकीमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने शनिवारी (दि.१३) आषाढी वारीतून वृक्षारोपण लागवड करून जनजगृती करण्यासाठी खडकीमाळ येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली.
ठळक मुद्दे ग्रामस्थ, भाविक, महिला, विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला.