येवला : तालुक्यातील एरंडगाव खुर्द शिवारात बिबट्या पिंजर्यात कैद झाला आहे.तालुक्यातील महालखेडा शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याचे वृत्त होते. या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या वतीने एरंडगाव खुर्द येथील सुधाकर पुंडलिक ढेरांगे यांच्या गट नं. 278 मध्ये पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजर्यात गुरूवारी (दि.५) पहाटे ५ वाजता बिबट्या कैद झाल्याचे आढळून आले.सदर नर बिबट्याचे वय सुमारे ४ वर्ष असून पशुवैद्यकीय अधिकारी यांनी बिबट्याची पाहणी करून सदर बिबट्या अधिवसात सोडण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे सांगितले.याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख, वनपाल मोहन पवार, प्रसाद पाटील, वनरक्षक गोपाळ हरगावकर, विलास देशमुख, सुनील भुरुख, भैय्या शेख, पिंटू नेहेरे, विजय माळी आदी उपस्थित होते.(०५ येवला बिबट्या)
एरंडगावी बिबट्या पिंजर्यात कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 10:31 PM
येवला : तालुक्यातील एरंडगाव खुर्द शिवारात बिबट्या पिंजर्यात कैद झाला आहे.
ठळक मुद्दे सदर बिबट्या अधिवसात सोडण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे सांगितले.