लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले असून, या निकालात अनेक त्रुटी असल्याचा आरोप केला असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना यासंदर्भात निवेदन देत सुधारित निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे.शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल दोन सत्र परीक्षेच्या आधारे निकाल लावण्यात येतो. परंतु यावर्षी कोरोना व ताळेबंदीमुळे महाविद्यालयात केवळ एकच सत्र परीक्षा घेण्यात आली असून, त्याआधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून निकाल तयार करण्यात आले. त्यामुळे उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक सरासरी इतके गुण न मिळाल्याने शेकडो विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, याविषयीची आढावा समिती गठित करून निकालाबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना दिल्याची माहिती अभाविपकडून देण्यात आली आहे. यावेळी अभाविपचे दुर्गेश केंगे यांच्यासह सागर जंजाळे, प्रसाद जोशी, मयूर जगताप, समृद्धी जोशी, प्रिया शिरसाम व पालक, विद्यार्थी उपस्थित होते.गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयाने अंतर्गत मूल्यांकन व परीक्षण करताना विद्यार्थ्यांकडून सबमिशनही घेतलेले नाही. त्यामुळे निकाल नेमका कोणत्या निकषांवर लावला? असा सवाल उपस्थितीत करीत अभाविपने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन प्राचार्यांना दिले आहे.
तंत्रनिकेतनच्या निकालात त्रुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:37 PM
नाशिक : शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले असून, या निकालात अनेक त्रुटी असल्याचा आरोप केला असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना यासंदर्भात निवेदन देत सुधारित निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे.
ठळक मुद्देअभाविपचा आरोप : सुधारित निकाल जाहिर करण्याची मागणी