नांदूरवैद्य : मुंबईहून नाशिककडे डोक्यावर बिºहाड घेऊन आपले मूळ गाव गाठण्यासाठी अनेक परप्रांतीयांचे स्थलांतर सुरूच आहे. अशातच इगतपुरीजवळील घाटनदेवी परिसरातील उंटदरी येथे काही परप्रांतीय नागरिक आले असता या परप्रांतीय नागरिकांना इगतपुरी पोलिसांनी अडवल्यानंतर त्यातील पाच परप्रांतीय नागरिक पोलिसांच्या भीतीपोटी उंटदरीत घाटरस्त्यात अंधाराचा फायदा घेत खाली उतरले, परंतु बाहेर निघण्यासाठी रस्ता न मिळाल्याने तिथेच अडकून पडले होते. यानंतर पोलीस व गस्त घालणाऱ्या अधिकारी यांची मदत घेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईकडून पायी प्रवास करणाºया परप्रांतीयांना घाटनदेवीजवळ पोलिसांनी अडविल्याने काही परप्रांतीयांनी घाटनदेवी मंदिरालगत असलेल्या उंटदरीतून पुढे निघण्याची शक्कल लढवली खरी, परंतु ती त्यांच्याच अंगलट आल्याची घटना इगतपुरीजवळ असलेल्या उंटदरीजवळ घडली.अंधारात अडकलेल्या या परप्रांतीय नागरिकांनी कसातरी इगतपुरी पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्र मांक मिळवत पोलिसांकडे मदतीसाठी याचना केली. या घटनेची माहिती मिळताच इगतपुरीचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तत्काळ मुंबई-नाशिक एक्स्प्रेस वे यांच्या गस्त घालणाºया पथकाला सदर घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर एक्स्प्रेस वे चे गस्त अधिकारी रवि देहाडे व त्यांचे सेवापथक हजर झाले.इगतपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व नाशिक-मुंबई एक्स्प्रेस वे चे अधिकारी यांनी दरीत अडकून पडलेल्या परप्रांतीयांची सुटका केली. यानंतर या परप्रांतीय नागरिकांना त्वरित नाशिक-मुंबई एक्स्प्रेस वे च्या रु ग्णवाहिकेतून इगतपुरी येथील ग्रामीण रु ग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले. या कामगिरीत पोलीस कर्मचारी गांगुर्डे, सपकाळे, मुंबई-नाशिक एक्स्प्रेस वे चे रु ट पेट्रोलिंग अधिकारी रवि देहाडे, प्रथमेश पुरोहित, संदीप म्हसणे, प्रवीण सोनवणे, देवेंद्र येडेकर, कसारा पोलीस ठाण्याचे राठोड, श्याम धुमाळ आदींनी सहभाग घेतला.
पोलिसांच्या हातून निसटले अन् दरीत अडकले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 12:02 AM
मुंबईहून नाशिककडे डोक्यावर बिºहाड घेऊन आपले मूळ गाव गाठण्यासाठी अनेक परप्रांतीयांचे स्थलांतर सुरूच आहे. अशातच इगतपुरीजवळील घाटनदेवी परिसरातील उंटदरी येथे काही परप्रांतीय नागरिक आले असता या परप्रांतीय नागरिकांना इगतपुरी पोलिसांनी अडवल्यानंतर त्यातील पाच परप्रांतीय नागरिक पोलिसांच्या भीतीपोटी उंटदरीत घाटरस्त्यात अंधाराचा फायदा घेत खाली उतरले, परंतु बाहेर निघण्यासाठी रस्ता न मिळाल्याने तिथेच अडकून पडले होते. यानंतर पोलीस व गस्त घालणाऱ्या अधिकारी यांची मदत घेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
ठळक मुद्दे कोरोनामुळे स्थलांतर; मुंबईहून निघालेल्या परप्रांतीयांच्या पलायनाची शक्कल आली अंगलट