नाशिक : कोणतीही कला सादर करायची असल्यास त्यासाठी रंगमंच आपल्यासाठी उपलब्ध असणे, हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणतीही कला सादर करायची असेल तर त्यासाठी गुरु करणं आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध कथक नृत्य गुरु विद्याताई देशपांडे यांनी व्यक्त केले.अंबडच्या ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूल अंबड, नाशिक येथे नृत्य साधना अकादमीतर्फे नृत्य साधना डान्स कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बक्षीस वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्या कथ्थक गुरू सुमुखी अथनी यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.भक्ती या संकल्पनेमध्ये देवभक्ती, मातृभक्ती, कृष्णभक्ती, प्रेमभक्ती आदी नृत्य तर भरतनाट्यम, कथ्थक, ओडीसी तसेच पाश्चिमात्य तसेच पारंपरिक नृत्य प्रकार सादर केले गेले होते. या स्पर्धेत रॉबीन गुसेन, कैलास कुरूप, सुनंदा सुराडकर आणि माधुरी सोनवणे यांनी परीक्षण केले. स्पर्धेत सोलो डान्स प्रकारात प्रथम पारितोषिक अनगा नामिबयार, द्वितीय पारितोषिक तेजस्विनी सुर्वे, तर तृतीय पारितोषिक अक्षता देशपांडे, उत्तेजनार्थ निकिता पवार आणि हारिका बागुल. तसेच दुहेरी नृत्य प्रकारात प्रथम पारितोषिक काजल भरीत व लालनी महाजन, द्वितीय पारितोषिक मंजूषा नायर व दृष्या नायर, तृतीय पारितोषिक निशिता विधाते व अषरिता अविकल, तर उत्तेजनार्थ जयेश कोटेचा व अपर्णा दिवे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नृत्यशिक्षक सागर बोरसे, परीक्षक रॉबीन गुसेन आणि कैलासनाथ कुरूप यांनी एक नृत्य सादर केले. कार्यक्र माचे प्रास्ताविक शाळेच्या संचालक विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी केले. सूत्रसंचालन रोहित पगारे यांनी केले.
कोणत्याही कलेसाठी गुरु लाभणं आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:49 AM
कोणतीही कला सादर करायची असल्यास त्यासाठी रंगमंच आपल्यासाठी उपलब्ध असणे, हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणतीही कला सादर करायची असेल तर त्यासाठी गुरु करणं आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध कथक नृत्य गुरु विद्याताई देशपांडे यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देविद्या देशपांडे : नृत्य स्पर्धेतील पुरस्कारांचे वितरण