नाशिक : नाशिक शहरात विकासाला मोठा वाव असून, पायाभूत सुविधा वाढविल्या तर मुंबई-पुणेनंतर नाशिकचा क्रमांक लागू शकेल. शहरात वाहतुकीसंबंधी सुविधांवर भर देण्याची गरज असल्याचे मत महापालिकेचे मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसीच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. शुक्रवारी (दि.९) सकाळी ११ वाजता ते आपला पदभार नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना अभिषेक कृष्ण यांनी आपल्या १९ महिन्यांच्या कारकिर्दीबद्दल समाधान व्यक्त केले. कृष्ण यांनी सांगितले, जुलै २०१६ मध्ये महापालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम राष्टÑीय हरित लवादापुढे सक्षमपणे बाजू मांडल्याने शहरातील रखडलेल्या बांधकाम परवानग्यांचा प्रश्न निकाली निघाला. याशिवाय खतप्रकल्प, घंटागाडी हे प्रलंबित विषयही मार्गी लागले. वृक्षगणनेचे काम मार्गी लागल्याने महापालिकेला आता आपली बाजू न्यायालयापुढे मांडता येणार आहे, परिणामी न्यायालयाने टाकलेल्या निर्बंधात शिथिलता मिळू शकते. मालमत्ता सर्वेक्षणामुळे नवीन ६७ हजार मिळकती सापडून उत्पन्नात भर पडणार आहे. अमृत योजनेंतर्गत गंगापूर आणि पिंपळगाव खांब एसटीपीचा प्रश्न मार्गी लागला आहे तसेच तवली फाटा व जेलरोड, दसक येथील उद्यानाचे काम झाले आहे. मुकणे पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत प्रोजेक्ट गोदा, स्मार्ट रोड, वॉटर आॅडिटच्या माध्यमातून स्काडा मीटर सिस्टम आदी प्रकल्पही होणार आहेत. महापालिकेत नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित झाले आहेत. नगररचना विभागात आॅटो डीसीआर प्रणाली कार्यान्वित होऊ शकली. गोदावरी संवर्धन कक्ष स्थापन करत गोदाघाटावरील स्वच्छतेबाबत सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले. नाशिक शहरात विकासाच्या भरपूर संधी आहेत. शहरात वाहतूक सुविधांवर अधिक काम करणे आवश्यक आहे. ट्रॅफिक सिग्नल व पार्किंगचा प्रश्न निकाली काढणे महत्त्वाचे असल्याचेही कृष्ण यांनी सांगितले. शहर बससेवा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळाली नसल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली.
वाहतूक सुविधांवर भर आवश्यक अभिषेक कृष्ण : शहरात विकासाला मोठा वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 1:35 AM
नाशिक : मुंबई-पुणेनंतर नाशिकचा क्रमांक लागू शकेल. वाहतुकीसंबंधी सुविधांवर भर देण्याची गरज असल्याचे मत मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ठळक मुद्देहरित लवादापुढे सक्षमपणे बाजूबांधकाम परवानग्यांचा प्रश्न निकाली