मखमलाबाद : येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य के. एस. गावले यांच्या मार्गदर्शनाखाली क्र ीडाशिक्षक आर. एफ. टर्ले यांनी या शालेय मंत्रिमंडळाची निवड करून त्यांना शपथ दिली. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्या ए. ए. घोलप, पर्यवेक्षक एच. एस. दरेकर, क्र ीडाशिक्षक जे. पी. पवार, ए. पी. पगार उपस्थित होते. शालेय मंत्रिमंडळात पंतप्रधान- मृणाली कापडणीस, उपपंतप्रधान-काजल फडोळ, सांस्कृतिक- गायत्री अहिरे, उपसांस्कृतिक- अथर्व रोकडे, आरोग्य-चंद्रमा रखमे, उपआरोग्य-विक्र ांत बदादे, क्र ीडा-दीक्षा डगळे, उपक्र ीडा-कृष्णा काकड, सहल-अनुराग काकड, उपसहल-खुशी परदेशी, पर्यावरण-श्रद्धा गायकवाड, उपपर्यावरण-यश पवार, अभ्यास-रितेश काठे, उपअभ्यास- गौतमी धात्रक, शिस्तमंत्री-आरती राऊत यांची निवड करण्यात आली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन डी. बी. शिंदे यांनी केले.
मखमलाबाद शाळेत मंत्रिमंडळाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:11 AM