बालस्नेही फलक अनावरप्रसंगी एस. टी. शिर्के, जयप्रकाश देशमुख, राजेंद्र चौधरी, भारत कानवडे, करिश्मा सूर्यवंशी.नाशिक : बालकांवरील अत्याचार थांबविण्याबरोबरच बालकामगार आणि बालके भीक्षेकरीमुक्त करण्यासाठी केंद्राने देशातील ५० धार्मिक स्थळांची निवड केली असून त्यामध्ये त्र्यंबकेश्वरचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत या ठिकाणी ‘बालस्नेही’ वॉल स्थापन करण्यात आली असून बालकांच्या संदर्भातील कोणत्याही प्रकारच्या तक्रारींचे निराकरण तसेच संपर्क साधण्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी देशातील धार्मिक स्थळांची निवड केली आहे. देशातील ५० स्थळांमध्ये नाशिकच्यात्र्यंबकेश्वरचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुसार बालकामगार, बालकांवरील अत्याचार याबाबत जिल्हास्तरावर मोहीम राबविली जाणार आहे. याठिकाणी वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीने बालकांना संरक्षित करण्यासाठी कार्यक्रम राबविला जाणार आहे.
त्र्यंबकेश्वरला ‘बालस्नेही’ वॉल स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 01:06 IST