मेशी : देवळा तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना वाढत असून त्यातच मेशी येथे देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर मेशी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरण कक्षाची स्थापना केली आहे.मेशी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने कोरोना झालेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक गावातच फिरताना निदर्शनास आले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यावर उपाय म्हणून व फिरणाऱ्या नागरिकांवर प्रतिबंध बसावा म्हणून सध्या मेशी येथील जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात एक विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे.यामुळे मेशीसह परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची व्यवस्था विद्यालयात करण्यात आली आहे. तालुका प्रशासन आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही नागरिकांनी याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे विलगीकरण कक्षाची अखेर स्थापना करावी लागली असे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले आहे. यावेळी सरपंच सुनंदा आहिरे, उपसरपंच भिका बोरसे आदींसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
मेशी येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 6:49 PM
मेशी : देवळा तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना वाढत असून त्यातच मेशी येथे देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर मेशी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरण कक्षाची स्थापना केली आहे.
ठळक मुद्देमेशी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात