मालेगाव : प्रशासकीय कामकाज, शासकीय योजनांची माहिती व तालुक्यातील गावांच्या सरपंचांमध्ये विचारांची देवाण-घेवाण व्हावी यासाठी तालुक्यात सरपंच संघटनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे.पंचायत समितीचे उपसभापती अनिल तेजा यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या संघटनेची कार्यकारिणी निवडण्यात आली. येथील पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी सरपंच परिषद बोलावण्यात आली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी उपसभापती तेजा होते. यावेळी नूतन कार्यकारिणी निवडण्यात येऊन अध्यक्षपदी रवींद्र सूर्यवंशी (मुंगसे), उपाध्यक्षापदी वैशाली निकम (ढवळेश्वर), सचिव- दीपाली इप्पर (उंबरदे), खजिनदार- महेंद्रसिंग सिसोदे (चिंचगव्हाण) यांची निवड करण्यात आली, तर सदस्य म्हणून लक्ष्मण रोकडे (चिखलओहोळ), प्रतिभा सूर्यवंशी (खडकी), मनीषा क्षीरसागर (सायणे), जयश्री देसले (झोडगे), राजेंद्र बोरके (जेऊर), योगीता निकम (मळगाव), सोनाली निकम (घोडेगाव), मायाबाई अहिरे (कुकाणे), कमल ठाकरे (खाकुर्डी), सरोज चव्हाण (पाटणे), प्रभाकर शेवाळे (टेहरे), नंदू पवार (दाभाडी), रोशनी सूर्यवंशी (अजंग), संदीप अहिरे (दुंधे), महेंद्र साळुंके (सावकारवाडी), विजय पवार (शिरसोंडी), सुमेरसिंग ठोके (नांदगाव) आदींचा समावेश आहे. यावेळी तेजा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.
मालेगावी सरपंच संघटनेची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 10:40 PM