लासलगाव : पोलीस स्टेशन कार्यालय अंतर्गत मागील वर्षी सन 2019 मध्ये सार्वजनिक 53 गणेशोत्सव मंडळानी तर एक गाव एक गणपती उपक्र म 27 गावात साजरा झाला. तर खासगी 20 ठिकाणी गणेशोत्सव मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. मात्र, यंदा कोरोनामुळे लासलगाव येथे अवघे पाच ठिकाणी तर एक गाव एक गणपती उपक्र म फक्त दोन गावात साजरा होत आहे.लासलगाव परीसरात घरोघरी श्री गणेश मूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विधीवत प्रतिष्ठापना केली. नागरिकांनी कोरोनामुळे गणेशोत्सव सुरिक्षततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करून साजरा करावा असे आवाहन निफाडचे पोलिस उपअधिक्षक माधव रेड्डी व लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी केले होते. त्यास नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे .यावर्षी मागील वर्षापेक्षा मूर्ती दरात वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली आहे. भविकांनी मनोभावे पूजा करून गणेशाचा जयघोष करीत मूर्ती घरी नेल्या. लोकांनी ईलेक्ट्रीकल दीपमाळा तसेच रंगीबेरंगी लाईट खरेदीला गर्दी केली होती.