इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा उद्रेक होतांना दिसून येत असून अनेक ठिकाणी रुग्णांना बेड तसेच ऑक्सिजन मिळविण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली गावातच उपचार करून औषधोपचार करता यावा यासाठी वंजारवाडी येथील सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांनी बैठक घेत पंचायत समितीचे सदस्य डॉ. मंगेश सोनवणे यांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी योगेश पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत विलगीकरण कक्षाची स्थापना केली. नाशिक शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी नाशिक येथे जावे लागत असून त्या ठिकाणी देखील ऑक्सिजन बेड मिळत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना परत यावे लागत असल्याचे चित्र परिसरात दिसत असून याच पार्श्वभूमीवर वंजारवाडीचे सरपंच यांनी याबाबत सदस्य व ग्रामस्थांची बैठक घेत सुसज्ज अशा २० बेडच्या विलगीकरण कक्षाची स्थापना केली. ज्या व्यक्तीस सर्दी, ताप, खोकला अशी प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास ग्रामपंचायतीच्या विलगीकरण कक्षात दाखल होण्याचे आवाहन सरपंच शिंदे यांनी केले आहे. या विलगीकरण कक्षात डाॅ. मंगेश सोनवणे यांच्यामार्फत दोन वेळा रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून ऑक्सिजन लेवल, तापमान आदींची देखील तपासणी करण्यात येणार आहे. रुग्णांना घरूनच जेवणाची सोय नातेवाइकांमार्फत करावी लागणार आहे. यावेळी सकाळी नाश्त्यासाठी दोन उकळलेली अंडी तसेच मास्क ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येणार असल्याचे सरपंच शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी उपसरपंच, गटविकास अधिकारी योगेश पगार, पोलीस पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कोरोना समितीचे सदस्य आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - ०५ नांदूर २
वंजारवाडी येथे विलगीकरण कक्षाची स्थापना करतेसमयी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे समवेत नाशिक पंचायत समितीचे सदस्य डॉ. मंगेश सोनवणे, ग्रामविकास अधिकारी योगेश पगार आदी.
===Photopath===
050521\05nsk_9_05052021_13.jpg
===Caption===
वंजारवाडी येथे विलगीकरण कक्षाची स्थापना करतेसमयी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे समवेत नाशिक पंचायत समितीचे सदस्य डॉ. मंगेश सोनवणे, ग्रामविकास अधिकारी योगेश पगार आदी.