पांढुर्ली : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांची व्यापारी पेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पांढुर्ली येथे व्यापारी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. सर्व दुकानदारांनी संघटना स्थापनेसाठी एकमुखी पाठिंबा दर्शविल्याने व्यापारी संघटनेची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी व्यापाऱ्यांच्या विविध अडीअडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संघटनेची नवीन कार्यकारिणीची यावेळी निवड करण्यात आली. प्रत्येक आठवड्यात बुधवारी सार्वजनिक सुटी घेण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र सण, उत्सव असल्यास त्या दिवशी दुकाने सुरू ठेवण्याचा ठराव करण्यात आला. संघटनेच्या अध्यक्षपदी गणपत वाजे, उपाध्यक्षपदी विष्णू पवार यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणी अशी : सरचिटणीस श्यामराव टिवटे, खजिनदार राजेंद्र केदार, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून विलास बर्वे, विक्रम वाजे, रवींद्र वालझाडे, बाळासाहेब केदार, सोपान दिवटे, वाघमारे आदि. (वार्ताहर)
पांढुर्ली येथे व्यापारी संघटनेची स्थापना
By admin | Published: June 16, 2014 1:01 AM