ठळक मुद्दे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले.
उमराणे : जलसाक्षरता दिनानिमित्त उसवाड, ता. चांदवड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी जलदिंडी काढून पाणीबचतीचा संदेश दिला.विद्यार्थ्यांनी डोक्यावर पाण्याचा कलश घेऊन पाणी अडवा-पाणी जिरवा, स्वच्छ पाणी सुंदर परिसर, जीवन होईल निरोगी निरंतर, थेंब थेंब वाचवू पाणी, आनंद येईल तुमच्या जीवनी अशा घोषणा देत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. शिक्षक संदीप हिरे यांनी पाण्याचे आपल्या जीवनातील स्थान व त्याचे महत्त्व विशद केले.यावेळी मुख्याध्यापक जिभाऊ कदम, श्यामराव चव्हाण, सुनीता भदाणे, संगीता हिरे, सविता भामरे, संदीप हिरे, प्रशांत देवरे, दत्तात्रय चांडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.