शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शाळांच्या गुणवत्तेचे मुल्यांकन फाईव्ह स्टार पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 5:41 PM

जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या वतीने मंगळवारी शासकीय कन्या शाळेत जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचेही मुल्यमापन आवश्यक असून यासाठी प्रत्येक शाळा व वर्गासाठी फाईव्ह स्टार पध्दत सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये ८० टक्यापेक्षा जास्त गुण असलेल्या शाळा व वर्गासाठी पाच स्टार,

ठळक मुद्देनरेश गिते : गुणवत्तेशी शिक्षकांची वेतनवाढ जोडणार

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्हापरिषदेच्या शाळांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांची असून, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना व वर्गांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी यापूढे फाईव्ह स्टार पध्दतीने मुल्यांकन करण्यात येणार आहे त्यासाठी प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी घेण्यात येणार आहे. प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची वेतनवाढ गुणवत्तेशी जोडणार येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या वतीने मंगळवारी शासकीय कन्या शाळेत जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचेही मुल्यमापन आवश्यक असून यासाठी प्रत्येक शाळा व वर्गासाठी फाईव्ह स्टार पध्दत सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये ८० टक्यापेक्षा जास्त गुण असलेल्या शाळा व वर्गासाठी पाच स्टार, ७० ते ८० टक्के दरम्यान गुण असलेल्या शाळांसाठी चार स्टार, ६० ते ७० टक्यांसाठी तीन स्टार, ५० ते ६० टक्के गुण असणा-या शाळांसाठी २ स्टार व ४० ते ५० टक्यांच्या दरम्यान गुण असलेल्या शाळा व वगार्साठी १ स्टार याप्रमाणे मुल्यांकन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ४० टक्यांपेक्षा कमी गुण असलेल्या शाळांसाठी १ ब्लॅक स्पॉट, ३० टक्यांपेक्षाही कमी गुण असलेल्या शाळांसाठी २ ब्लॅक स्पॉट देण्यात येणार आहे. ज्या शिक्षकांना १ किंवा २ ब्लॅक स्पॉट मिळतील त्यांची वेतनवाढ रोखण्यात येणार असून यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना ६ महिने संधी देण्यात येणार असून अपेक्षित सुधारणा झाल्यास वेतनवाढ पूर्ववत करण्याचे ठरविण्यात आले.गुणवत्तेचे मुल्यमापन करण्यासाठी दरमहा विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या वहीमध्येच प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी देण्यात येणार आहे. प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे मुल्यांकन करावयाचे असून त्यानंतर मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्रतिनिधी यांचेमार्फत पुर्नमुल्यांकन करण्यात येणार आहे. विविध कंपन्यांच्या सीएसआर मधून शाळांसाठी संगणक, प्रोजेक्टर घेण्यात येणार असून १०० शाळा डिजिटल करण्यात येणार आहेत. तसेच व्हच्युअल क्लासरुमव्दारे विविध तज्ञ शिक्षकांचे व्याख्यान तसेच उच्च पदस्थ अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी केले. बैठकीस माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्यासह प्रादेशिक, विद्या प्राधिकरण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता, गट शिक्षण अधिकारी, विषयानिहाय तज्ञ शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाSchoolशाळा