इगतपुरी : दहा दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कोलमडलेली मध्य रेल्वेची सेवा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पावसामुळे विस्कळीत झालेली रेल्वेसेवा पूर्वपदावर आणण्याकरीता रेल्वे प्रशासनाला तब्बल दीड दिवस लागला.सोमवारी (दि.५) सकाळी मनमाडहून मुंबईला जाणारी गोदावरी एक्सप्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकात ११.३० वाजता पोहोचली तर कुर्ला टर्मिनलहून निघालेली गोदान एक्सप्रेस दुपारी २ वाजता इगतपुरी स्थानकात आल्याने प्रवाशी वर्गाने समाधान व्यक्त केले. हळूहळू रेल्वे सेवा पूर्व पदावर येत असल्याचे रेल्वे प्रशासना कडुन सांगण्यात आले. रविवारी परिसरात मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई व कसारा स्थानकावर पाणी साचले होते त्यामुळे दुरंतो एक्सप्रेस इगतपुरी स्थानकात पहाटेपासून थांबविण्यात आली होती. तब्बल १३ तासांनी ही गाडी इगतपुरी रेल्वे स्थाकात रद्द करण्यात आली त्यामुळे त्यातील प्रवाशांना रेल्वे प्रशासन, प्रांतअधिकारी राहुल पाटील व तहसिलदार वंदना खरमाळे यांच्या आदेश नुसार इगतपुरी बस आगारातील दहा ते बारा बस उपलब्ध करून देण्यात येऊन त्यांना कल्याण स्थानकापर्यंत सुखरूप पोहोचविण्यात आले तर काही प्रवाशांनी खाजगी वाहनाने पुढील प्रवास केला .इन्फोरद्द झालेल्या रेल्वे गाडयामनमाड पंचवटी एक्सप्रेस, राज्य राणी एक्सप्रेस, इगतपुरी शटल, मुंबई पॅसेंजर, मनमाड पुणे शटल आदी गाडया रेल्वे प्रशासनाने सोमवारी (दि.५) रद्द केल्या. सकाळी अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक सकाळ पर्यंत बंद होती.
मध्य रेल्वेची सेवा पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 6:22 PM
प्रवाशांकडून समाधान : पावसाचा जोर ओसरला
ठळक मुद्देगोदान एक्सप्रेस दुपारी २ वाजता इगतपुरी स्थानकात आल्याने प्रवाशी वर्गाने समाधान व्यक्त केले