नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा गमाविल्यानंतर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मंथन बैठकीत ईव्हीएमबाबत संशय व्यक्त करताना पक्षातील गद्दारांवर तोंडसुख घेण्यात आले. पक्षातील फुटिरांची नावे आपल्याला गोपनीय पाकिटातून द्यावीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी यावेळी दिला.लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत बैठक घेऊन आढावा घेतला होता. त्यानंतर गुरुवारी (दि.६) नाशिक शहरातील राष्टÑवादी भवनात छगन भुजबळ यांनी पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक घेतली. या बैठकीत फुटिरांबरोबरच कर्तृत्वशून्य निष्क्रिय पदााधिकाऱ्यांवर अन्य अनेक जणांनी टीका केली आणि असे निष्क्रिय पदाधिकारी बदलण्याची जोरदार मागणी करण्यात आली.देशभरात जे घडले, त्यापेक्षा वेगळे नाशिकमध्ये घडले नाही. त्यामुळे पराभवामुळे खचून जाऊ नये, असे सांगतानाच भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची सूचना छगन भुजबळ यांनी केली आहे. यावेळी भुजबळ यांनी ईव्हीएमविषयी शंका उपस्थित केली. देशभरात तीनशे मतदार ठिकाणी झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यात फरक असल्याचे आढळले आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकांवरच मतदान घेतले जावे, अशी मागणी देशपातळीवर जोर धरत आहे. देशात संशयाचे वातावरण असून, सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप केल जात आहे. त्याचप्रमाणे माध्यमांची मुस्काटदाबी केली जात असल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला.बैठकीस माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, धनराज महाले, माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, विश्वास ठाकूर, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, अर्जुन टिळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.कार्यकारिणी बदलणारयावेळी पक्षविरोधी काम करणाºया पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यात आली अनेकांनी मनोगतामध्ये चांगले आणि कार्यक्षम पदाधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली. नव्या कार्यकारिणीत ताज्या दमाच्या पदाधिकाºयांना संधी देण्याची मागणी करण्यात आली.
‘ईव्हीएम’बरोबरच राष्टÑवादीचा गद्दारांवरही राग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 12:45 AM