नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने भूजल पातळीतही काही प्रमाणात वाढ झालेली आहे. असे असले तरी उद्या पाणी हवे असले तर आजच पाणी जपून वापरावे लागणार आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि पावसाची असमानता यामुळे तालुक्यांमधील पाण्याचे संदर्भ बदलले आहेत.
गेल्या दोन वर्षांतील पर्जन्यमानाची कामगिरी पाहिली तर दुष्काळी तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. तर ज्या तालुक्यांमध्ये नेहमी चांगला पाऊस झाला अशा ठिकाणी सरासरी पाऊस झाला. आदिवासीबहुल भागात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी खडकाळ भागात पाणी वाहून जात असतेच. शिवाय जमिनीअंतर्गत रचनेमुळे पाणी साठून राहत नसल्याने अशा तालुक्यांना दुष्काळाचाही सामना करावा लागतो. या सर्वांचा अभ्यास दरवर्षी भूजल विभागाकडून केला जातो. त्यांच्या अभ्यासात्मक निरीक्षणातून जिल्ह्याच्या सप्टेंबर २०२१ च्या भूजल आकडेवारीनुसार तालुक्यातील पाण्याची पातळी लक्षात येते.
१११ निरीक्षण विहिरींची तपासली पातळी
भूजल विभागाच्या सप्टेंबर २०२१ च्या अहवालानुसार जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील जवळपास १११ विहिरींच्या पाणी पातळीचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर अशा चार टप्प्यांमध्ये निरीक्षण घेतले जाते. मालेगाव, नांदगाव आणि निफाड तालुक्यांमध्ये निरीक्षण केलेल्या विहिरींची संख्या अधिक आहे.
कोणत्या तालुक्याची भूजलपातळी किती? (आकडे मीटरमध्ये)
तालुका २०१७ २०१८ २०१९ २०२० २०२१
बागलाण : ८.८० ९.०९ ४.७३ ४.७३ ४.९६
चांदवड : ५.६७
देवळा ; ५.४६
दिंडोरी : २.५८
इगतपुरी : १.२८
कळवण : ४.७५
मालेगाव : ५.६९
नांदगाव : ५.४२
नाशिक : ३.९४
निफाड : २.४१
पेठ : १.५३
सिन्नर: ३.२०
सुरगाणा: १.५०
त्र्यंबकेश्वर: १.२९
येवला: ३.९३
उद्यासाठी पाणी शिल्लक ठेवा
जिल्ह्यातील पावसाची पातळी समाधानकारक दिसत असली तरी पावसाचा लहरीपणा लक्षात घेता असलेला पाणीसाठा जपून वापरावा लागणार आहे. सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. परंतु तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमानात तफावत असल्याने तालुक्यांना पाणी नियोजनावर भर द्यावा लागणार आहे.
येवल्यात पातळी अधिक
येवला तालुक्यात पाण्याची पातळी अधिक असल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी येवला तालुक्यातील पातळी २.१६ मीटरने वाढली आहे. मालेगाव, नांदगावमध्ये यंदा पाऊस बरसला असल्याने पातळीतही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. इतर तालुक्यातील पातळी मात्र सामान्य आहे.