लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : नाशिक शहराबरोबर कोरोना विषाणू ने आता ग्रामीण भागात पाय पसरायला सुरु वात केली असून खबरदारीचा उपाय म्हणून पेठ नगरपंचायतीने शहरातील व्यावसायिकांसाठी सम- विषम फॉर्म्यूला ठरवून दिला आहे.पेठ तालुक्यात अद्याप कोरोनाचा रु ग्ण आढळून आला नसला तरी अनलॉक १ नंतर शहरात वर्दळ वाढली आहे. प्रारंभी सर्वच व्यावसायिकांनी आपली दुकाने ऊघडी ठेवल्याने बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने सोमवारपासून सम-विषम तारखांना व्यवसाय सुरू ठेवण्याबाबत व्यावसायिकांना नोटीस जारी केली. बलसाड रोड व मुख्य बाजार पेठेतील डाव्या व उजव्याकडील बाजूंना ठरवून दिलेल्या तारखेला व्यवसाय सुरू ठेवावेत असे आदेश देण्यात आले. मंगळवारी (दि.२३) नगरपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांनी शहरात फेरी मारून नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले.गर्दी काही थांबेना...पेठ हे तालुक्यातील मुख्य बाजारपेठेचे शहर असल्याने प्रशासनाकडून उपाययोजना करूनही होणार्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठिण झाले आहे. एका बाजूने दुकाने बंद असली तरी नागरिक दुसर्या बाजूने दुकानांमध्ये गर्दी करतांना दिसून येत असून यामूळे योग्य खबरदारी घेतांना व्यावसायिकांनाही कसरत करावी लागत आहे.सद्या पेरणी व पावसाळ्याचे दिवस असल्याने खेडयापाडयावरून पेठ शहरात येणाऱ्यांची संख्या वाढली असून यामध्ये कोण कोठून येतो याचा अंदाज नसल्याने प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून येते.फेरीवाल्यांची अलटी-पलटी ...पेठ शहरात जुन्या बसस्थानकापासून हुतात्मा स्मारकापर्यंत बलसाडरोडच्या दोन्ही बाजूला मोठया प्रमाणावर छोटे विक्रेते रस्त्याच्या कडेला आपली दुकाने लावतात. प्रशासनाने सम विषम फॉर्म्यूला ठरवून दिल्यानंतर फेरीवाल्यांनी मात्र अलटी-पलटी सुरू केल्याचे दिसून येते.दरम्यान आज उजव्या तर दुसºया दिवशी डाव्या बाजूला दुकाने लाऊन प्रशासनाची ही दिशाभूल केली जात असल्याचाही प्रकार घडतांना दिसून येत आहे.
पेठ शहरात सम- विषम फॉर्म्यूला सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 3:05 PM
पेठ : नाशिक शहराबरोबर कोरोना विषाणू ने आता ग्रामीण भागात पाय पसरायला सुरु वात केली असून खबरदारीचा उपाय म्हणून पेठ नगरपंचायतीने शहरातील व्यावसायिकांसाठी सम- विषम फॉर्म्यूला ठरवून दिला आहे.
ठळक मुद्देकोवीड उपाययोजना -गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाची कसरत