नाशिक : शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन बाजारपेठेत होणारा गोंधळ टाळण्यासाठी महापालिकेने आता मेनरोडसारख्या बाजारपेठांमध्ये सम आणि विषम तारखेला कोणती दुकाने सुरू राहतील याच्या आखणीला मंगळवार (दि.९)पासून प्रारंभ केला आहे. आता त्यानंतरही व्यावसायिकांनी उल्लंघन केल्यास संंबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून शहरातील सर्व बाजारपेठा बंद आहेत. शासनाने आता सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आणि महापालिका आयुक्तांना यासंदर्भातील शिथिलतेचे अधिकार दिले. त्यानुसार शहरातील बाजारपेठा सुरळीत करण्यासाठी गेल्या आठवड्यात शुक्रवारी (दि.५) आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यापारी संघटना प्रतिनिधींची बैठक घेतली आणि सम-विषम यापद्धतीनेच दुकाने सुरू करता येतील असे सांगितले तर ज्या ठिकाणी सम-विषम लागू करण्यायोग्य बाजारपेठा नाही त्याबाबत विभागीय अधिकारी निर्णय घेतील, असे जाहीर केले. त्यानंतर शनिवारी (दि.६) बाजारपेठा खुल्या झाल्या; परंतु कोणत्याही प्रकारे सम-विषम तारखानुसार दुकाने सुरू करण्याचे पथ्य पाळले नाही. त्यामुळे ही आखणी करून देण्यात येत आहे.---------------------------घोळ दुकानदारांचा नव्हे महापालिकेचाचशहरातील बाजारपेठा खुल्या करताच सम-विषम तारखेनुसार दुकाने सुरू न करता सर्वच व्यावसायिकांनी दुतर्फा दुकाने सुरू केली. त्यामुळे गोंधळ उडाला. तथापि, या घोळास महापालिकाच जबाबदार असल्याची दुकानदारांची तक्रार आहे. सम तारखेला कोणती दुकाने खुली करावी आणि कोणती विषम तारखेला सुरू करावी याबाबत त्या त्या बाजारपेठेत जाऊन आखणी करून देणे आवश्यक होते. परंतु तशी कोणतीही कल्पना देण्यात आली नाही की, त्याठिकाणी आखणीही करून देण्यात आली नाही. त्यामुळेच गोंधळ उडाला.
मेनरोडवर सम-विषमची आखणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 10:38 PM