लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण यांसारख्या दुर्गम तालुक्यांतील विद्यार्थीदहावीच्या परीक्षेत उत्तीर्णतेच्या प्रमाणात आघाडीवर राहिले असून, दहावीच्या यावर्षीच्या निकालातून जिल्ह्यातील दुर्गम भागातही मुलींचीच सरशी झाल्याचे अधोरेखित झाले आहे.जिल्ह्यात उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातील एकूण ८९ हजार ७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ८४ हजार ५५८ म्हणजेच (९४.९३ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ९३.६१ टक्के मुले, तर ९६.४३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ९६.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सुरगाणा ९६.७३, कळवण ९६.१५, इगतपुरी ९४.३६ व पेठ तालुक्यातील ९२.९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. चांदवड ९५.५, दिंडोरी, ९५.१७, देवळा ९५.७४, मालेगाव ९२.२३, मालेगाव शहर ९१.४८, नाशिक ९३, नाशिक शहर ९७.१२, निफाड ९४.४०, नांदगाव ९५.६४, सटाणा ९३.९८, सिन्नर ९५.४६ व येवल्यातील ९४.१८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. (विशेष पान २/३)