अनेक वर्षांपासून या फरशींची डागडुजी झालेली नाही. फरशीची उंची कमी असल्याने पाइपमध्ये गवत किंवा माती जाऊन ते बंद होतात व पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे फरशीचे नुकसान दरवर्षी होत असते. आता मात्र फरशीच्या कडेचे खड्डे वाढले असून, वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहे. पावसाळा तोंडावर येऊनही फरशीच्या कामाला कुठलाच प्रतिसाद मिळत नाही. त्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तीन वर्षांपूर्वी बैल चारण्यासाठी गेलेले वामन बस्ते पुरात वाहून गेले होते. त्यावेळी फरशीचे काम करण्याचे आश्वासन देऊनही पुढे काहीच झाले नाही. आता फरशीवरून पडून काही घटना किंवा पावसाळ्यात फरशीच वाहून गेली, तर याला जबाबदार कोण, असा सवाल बस्ते यांनी केला आहे. या फरशी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे ऑनलाइन तक्रार करणार असल्याचे बस्ते यांनी म्हटले आहे.
पावसाळा तोंडावर येऊनही फरशीचे काम होईना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:12 AM