ज्येष्ठ नागरिक दिन विशेषनाशिक : शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने व रोजगाराच्या शोधात तरुण वर्ग व्यवसाय, नोकरीनिमित्ताने ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतराच्या वाढत्या प्रमाणाबरोबरच विभक्त कुटुंब पद्धती रूढ होत आहे. त्यामुळे काही पाल्यांकडून त्यांच्या आई-वडिलांना वाऱ्यावर सोडल्यामुळे वृद्धाश्रामातील वृद्धांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यातच शासनाने लागू केलेल्या विविध योजनांपासून आजही ज्येष्ठ नागरिक वंचित असल्याचे दिसत आहे.सध्या देशात सुमारे १३ कोटी ज्येष्ठ नागरिक आहे. ही संख्या एखाद्या देशाएवढी आहे. देशात ‘वृद्धाश्रम’ योजनेत अनाथ, निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाने वृद्धाश्रम ही योजना सुरू केलेली आहे. तसेच ‘मातोश्री वृद्धाश्रम’ योजना ही ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमामध्ये सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात. ज्येष्ठांना ओळखपत्र देणे ही एक योजना त्यांच्यासाठी कार्यान्वित आहे. ओळखपत्र दिल्यानंतर त्यांना बस प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत मिळते. शिवाय रेल्वे, बँक इत्यादी ठिकाणीही त्यांना सुविधा मिळतात. मात्र अद्याप अनेक ज्येष्ठ नागरिकांना हे ओळखपत्र मिळालेले नाही. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत निराधार व आर्थिकदृष्ट्या मागास वृद्ध नागरिकांनाही लाभ देण्यात येतो. त्यांना प्रती महिना ६०० रुपये देण्यात येतात. तसेच श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ निवृत्तियोजना या योजनेंतर्गत ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांना लाभ देण्यात येतो. यापासून अनेक जण वंचित आहेत.ज्येष्ठ नागरिकांच्या इतर मागण्याबस व इतर सुविधांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्राला सध्या ६५ वर्षांची वयोमर्यादा आहे मात्र ती ६० वर्षे करण्यात यावी, ज्येष्ठांना मेडिकल सुविधांचा लाभ मिळावा, तसेच घरात असणारे वाढते गृहकलह थांबवावे त्यासाठी विशेष तरतुदी करावी, वृद्धाश्रमांची संख्या वाढवावी, बॅँक , बस, रेल्वेमध्ये ज्येष्ठांसाठी स्वतंत्र्य सुविधा असाव्यात, तसेच शासनाने बंद केलेले समाजगृहे ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात यावे तसेच सद्यस्थितीत असलेले ज्येष्ठ नागरिकांचे सभागृहांना वाढीव भाड्यापासून सुटका करावी. यासारख्या अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या आहेत.ज्येष्ठांना मेडिकल सुविधा उपलब्ध करून द्यावा. सध्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणाºया सवलती या तोकड्या असून, शासनाने आमच्या बांधवांसाठी विशेष सवलती द्याव्यात तसेच ज्येष्ठ नागरिकाची वयोमर्यादा ही ६५ वर्षांवरून ६०वर करण्यात यावी. यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.- बापूसाहेब कुलकर्णी, अध्यक्ष,निरामय ज्येष्ठ नागरिक संघ, डीजीपीनगरज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या योजना व तरतुदींपासून आजही अनेक वृद्ध वंचित आहे. तसेच शासकीय कार्यालयामध्ये ज्येष्ठांना मिळणारी वागणूक ही निंदनीय आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनांसाठी त्यांच्या भागातच त्यांना हक्काचे सभागृह मिळणे आवश्यक आहे.- मुकुंद भणगे, अध्यक्ष,कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघ, इंदिरानगरशासनाने जुलैमध्ये सर्व पालिका, महापालिकांना शहरातील ज्येष्ठांसाठी मोफत आरोग्य शिबिर व औषधे पुरविले पाहिजे, असी तरतूद केली आहे, परंतु एकाही शहरात याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनांसाठी विरंगुळा कें द्र उभारले गेले पाहिजे, मात्र पालिका आहे त्या केंद्रांना वाढीव भाडे लावून नागरिकांच्या खिशाला कात्री लावत आहेत.- विजय भावे, अध्यक्ष, शतायुुषी ज्येष्ठ नागरिक संघ, राजीवनगर
संध्यासमयी हेळसांड थांबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 1:28 AM