लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्णातील शासकीय गुदामांना अन्नधान्य महामंडळातून धान्य पुरविणाºया वाहतूक ठेकेदारांनी सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर अंग काढून घेतल्यानंतर खासगी वाहतूकदारांकरवी केल्या जाणाºया धान्य वाहतुकीसाठी अखेर पुरवठा खात्याला ठेकेदार मिळाला असून, चालू महिन्यापासून थेट रेशन दुकानदाराच्या दाराशी धान्य पोहोचविण्यास सुरुवात होणार आहे.नाशिक जिल्ह्णात गेल्या पाच वर्षांपासून खासगी व्यक्तींकडून रेशनच्या धान्याची वाहतूक केली जात होती. त्यासाठी काही खासगी वाहने अधिग्रहित करण्यात आली, तर काही ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची मदत घेण्यात आली. सुरगाणा येथील धान्य घोटाळ्यानंतर धान्य वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मनमाडच्या अन्नधान्य महामंडळातून निघणारे धान्य प्रत्यक्षात सुरगाणा शासकीय गुदामात न पोहोचता, धान्य वाहतूक ठेकेदाराच्या संगनमताने त्याची परस्पर काळ्याबाजारात विक्री केली जात असल्याची बाब उघडकीस आल्याने पोलिसांत ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मात्र रेशनच्या धान्य वाहतुकीसाठी एकही ठेकेदार पुढे आला नाही. नाशिक जिल्ह्णात खासगी ठेकेदारामार्फत धान्य वाहतुकीसाठी दहा ते बारा वेळा निविदा मागविण्यात आल्या परंतु त्याला प्रतिसाद मिळू शकला नाही, त्यामागे धान्य वाहतुकीसाठी मिळणारा वाहतूक दर कमी असल्याचे कारण दिले जात होते. या संदर्भात शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यावर काही महिन्यांपूर्वीच शासनाने धान्य वाहतुकीचे दर वाढवून दिल्याने पुरवठा विभागाने निविदा मागविल्या होत्या.गेल्या आठवड्यात पुरवठा विभागाने धान्य वाहतूकदारांच्या निविदा उघडल्या असता नऊ ठेकेदारांनी त्यासाठी तयारी दर्शविली, त्यापैकी मनमाड येथील ‘पाटील अॅण्ड पाटील’या वाहतूक कंपनीने कमी दरात शासकीय धान्य वाहतुकीची अनुमती दर्शविल्याने त्यांना ठेका देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार आता मनमाड येथील अन्नधान्य महामंडळातून शासकीय गुदाम तसेच शासकीय गुदामातून थेट रेशन दुकानदाराच्या दाराशी धान्य पोहोच केले जाणार आहे. दुकानदारांना दिलासारेशन दुकानदारांना यापूर्वी शासकीय धान्याची गुदामातून स्वखर्चाने रेशन दुकानापर्यंत वाहतूक करावी लागत होती व नंतर पुरवठा विभागाकडून त्यांना वाहतुकीचा खर्च अदा केला जात; मात्र ते पैसेही वेळेवर मिळत नसल्याची तक्रार करीत रेशन दुकानदारांनी गेल्या अनेक वर्षांपासून द्वारपोच धान्य मिळावे अशी मागणी लावून धरली होती. सध्या सुरू असलेल्या त्यांच्या बेमुदत संपासाठी हेदेखील एक कारण होते. त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.
अखेर वाहतूक ठेकेदार मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 12:31 AM