पिंपळगाव बसवंत : बेहेड येथील महिलांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर अखेर पोलीस ठाण्यातून गायब अल्टो गाडी ठाण्यात दाखल झाली. या घटनेनंतर जिल्हा प्रशासन अवैधधान्य वाहतूकदारावर वघटना दाबण्याचा प्रयत्न करणाºयावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.बेहेड गावातील धान्य भरलेली गाडी महिलांनी रविवारी पोलीस ठाण्यात जमा केली होती. सोमवारी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी गाडी सोडून दिली. महिलांनी मोर्चा काढत गाडी कशी गायब झाली, रेशन दुकानदारवर कारवाही झाली नसल्याचा आरोप केला. जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके व तहसीलदार विनिद भामरे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत कारवाईचे आश्वासन दिले. बुधवारी रात्री गाडी अचानक पोलीस ठाण्यात दाखल झाली. तहसीलदार विनोद भामरे यांनी त्याचा अहवाल पुरवठा अधिकारी यांना सादर केला आहे. गायब झालेली गाडी दाखल कशी झाली, या प्रकरणी संश्यितावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे.
अखेर ‘ती’ गाडी पिंपळगाव पोलीस ठाण्यात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:58 PM