नाशिक : वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले रामायण हे त्याकाळी घडलेल्या घटनांची नोंद घेत त्याला मांडण्यात आले आहे. याचा अभ्यास करताना हे सत्य की कल्पना असा विचार नक्की पडू शकतो; मात्र त्याचा अभ्यास करताना प्रत्येकाने आपल्या नजरेतून रामायण समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास ते सत्य असल्याचे दिसून येते, असे रामायणाचे अभ्यासक यशोदीप देवधर यांनी सांगितले आहे.कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे कुसुमाग्रज स्मारकात रामायण हे सत्य की असत्य हा कार्यक्र म पार पडला आहे. यावेळी देवधर यांनी सांगितले की, जगातील संशोधक, नागरिक आदी मंडळी हे महाकाव्य आवडीने वाचतात; मात्र असे चित्र असले तरी अनेकदा मनात प्रश्न येऊन जातो की, प्रभू रामचंद्र खरंच कोण होते? यातील हजार श्लोकांचा खरंच नेमका अर्थ काय? अशा सर्व प्रश्नांची मालिकाच सुरू होते. या विषयासोबत निगडित प्रश्नांवर देवधर यांनी उपस्थितासोबत संवाद साधला. तसेच वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणातील काही महत्त्वाच्या श्लोकांचा अर्थ देवधर यांनी सांगितला आहे. आयडिया कॉलेजचे विजय सोहनी यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक केले.
प्रत्येकाने रामायण समजून घ्यावे : यशोदीप देवधर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:03 AM