सातपूर येथील क्षेत्रीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना मुख्य प्रबंधक वहराप्रसाद यांनी सांगितले की, ‘सक्षम २०२१’ (संरक्षण क्षमता महोत्सव) हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम असून, नैसर्गिक इंधन वाचवणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. देशात आपण दररोज पेट्रोलचे विविध उत्पादन वापरतो. दररोज पेट्रोलियम पदार्थांची विक्री होते. आणि ग्राहक ती वापरत असतात. मात्र भारत सरकारची योजना आहे की, वर्षातून अकरा महिने तर आपण पेट्रोलियम ऊर्जेचा वापर तर करीत असतोच; पण दरवर्षी दि. १५ जानेवारी ते दि. १६ फेब्रुवारीदरम्यान किमान हा एक महिना तरी भारतीय नागरिकांनी कमीत कमी प्रमाणात या ऊर्जेचा वापर करावा. यामुळे या नैसर्गिक ऊर्जेची बचत होईल व पर्यावरणालादेखील फायदा पोहोचेल. या उपक्रमात प्रामुख्याने शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी इंधन संवर्धन, पेट्रोलपंप, गॅस एजन्सीज आदींबाबत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय बैठक, कार्यशाळाद्वारे इंधन संवर्धनावरील मोहिमा, गृहिणींसाठी गटचर्चा, विविध सामाजिक संस्थांसाठी मोहीम, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा आयोजित केल्याचे सांगितले.
‘नैसर्गिक इंधन वाचवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:16 AM