राजपूत समाज संस्थेच्यावतीने आयोजित आभासी व्याख्यानमालेत " मेरा भारत महान " या विषयावर ते बोलत होते. नायक दीपचंद यांनी पुढे सांगितले ,
महाराणा प्रताप यांच्या सारख्या महापुरुषांचे चरित्र व विचार पुढील पिढ्यांच्या मनावर बिंबवणे आवश्यक असून ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जन्म हा आपल्या हातात नसतो परंतु चांगले कर्म करणे हे आपल्या हातात असते. कर्माच्या आधारावरच व्यक्तीची महानता निश्चित होत असते. असे सांगून त्यांनी युद्धातील प्रेरक प्रसंग व आयुष्यातील अनुभव कथन केले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य तानसेन जगताप होते.
प्रारंभी नायक दीपचंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्रा.संजीव पवार यांनी प्रास्तविक केले. उत्सव समितीचे अध्यक्ष धर्मा साळुंखे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. समन्वयक मिलिंद राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. सुमित राजपूत यांनी आभार मानले. यावेळी किरण खाबिया, नितीन गिरासे,जयदीप पवार,दिनेश पाटील,राजेंद्र चौहाण,जयप्रकाश गिरासे,रामसिंग बावरी,वीरेंद्रसिंग टिळे,सुनील परदेशी,बबलूसिंग परदेशी,डी.आर.पाटील, जयदीप राजपूत, भवानसिंग सोलंकी,महेंद्र राजपूत, सुनील पवार आदींसह राजपूत समाज संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो :- महाराणा प्रताप जयंतीनिमित्त व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात ध्वजारोहण प्रसंगी कारगिल योद्धा नायक दीपचंद समवेत वीरेंद्र सिंग,महेंद्र राजपूत,सुनील पवार, धर्मा साळुंखे,मिलिंद राजपूत,योगेश राजपूत,रामसिंग बावरी,भवानसिंग सोलंकी,बबलूसिंग परदेशी,राजेंद्र पाटील आदी. (फोटो १५ सातपूर १)