नाशिक : मुंबईत निवृत्त नौदल अधिकाºयाला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रविवारी माजी सैनिकांनी हुतात्मा स्मारकासमोर निदर्शने केली. संशयितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टून सोशल माध्यमातून फॉरवर्ड केल्याने काही शिव सैनिकांनी नौ दलाच्या माजी सैनिकास मारहाण केली. गेल्या दोन दिवसांपासून त्याचे मोठ्या प्रमाणावर राजकीय पडसाद उमटले असून, विरोधी पक्षांनी सरकारविरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी माजी सैनिकांनी हुतात्मा स्मारकात राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या प्रकरणातील संशयितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी विविध घटकांकडून करण्यात येत आहे.या आंदोलनात विजय पवार, लक्ष्मीकांत परनेरकर, फुलचंद पाटील, दिनकर पवार, पांडुरंग चौधरी, श्रीराम आढाव, संभाजी पाटील, शीतल पाटील, समाधान सोनवणे, अविनाश कुलकर्णी, सूर्यकांत आहेर, कृष्णा थोरात आदींसह माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी सैनिकांची सरकारच्या विरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 12:52 AM