चांदवड - येथील आबड-लोढा-जैन महाविद्यालयात अल्युमनी असोसिएशन तर्फे माजी विदयार्थी मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जी.एच.जैन हे होते. धर्मदाय आयुक्तांकडे अधिकृत नोंदणी केल्यानंतर हा मेळावा दुसऱ्यांदा आयोजित केला होता. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले . प्रास्ताविक अल्युमनी असोसिएशनचे सचिव प्रा.राहुल अहिरराव यांनी केले. त्यात त्यांनी माजी विदयार्थी मेळाव्याचे महत्व सांगितले. यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आदर्श प्राचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य जैन यांचा सत्कार माजी विदयार्थी उद्योजक दिलीप गारे यांच्या हस्ते करण्यात आला .प्राचार्य जैन यांच्या एकूण कार्याची माहिती डॉ.तुषार चांदवडकर यांनी दिली. नंतर सदस्य प्रा.राहुल आहिरराव,पत्रकार महेश गुजराथी, अॅड सुदर्शन पानसरे व धनंजय (समीर )काळे यांचा सत्कार उपप्राचार्य डॉ.दत्ता शिंपी,उपप्राचार्य डॉ.सुरेश पाटील व उपप्राचार्य प्रा.एस.पी.खैरनार यांनी केला. यानंतर माजी विद्यार्थ्यांची भाषणे झाली दिलीप गारे,प्रा.एम.एम.यशवंते ,कवी विष्णू थोरे,महेश गुजराथी, विजय विठ्ठल काटे,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संदीप महाले , विशाल त्रिवेदी, कवी सागर,जाधव , अॅड.अजित जाधव, महेश ठाकरे,बाळू केदारे, प्रा.योगेश गांगुर्डे, सचिन दत्तात्रय राउत, ज्योती वाघ, राजेदरवाडी सरपंच मनोज शिंदे यांनी आपल्या महाविद्यालीन आठवणीना उजाळा दिला. प्रा.डॉ.सुरेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी असोशियशन तर्फे जिल्हा परिषद शाळेस ११००० रु पयाची देणगी देण्यात आली. दिलीप गारे यांनी अलुमनी असोशियशनला ५१०० रु पये देणगी दिली. प्राचार्य डॉ.जी.एच.जैन यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय पाडवी यांनी केले तर प्रकाश शेळके यांनी आभारप्रदर्शन केले.
चांदवड महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 6:03 PM
चांदवड - येथील आबड-लोढा-जैन महाविद्यालयात अल्युमनी असोसिएशन तर्फे माजी विदयार्थी मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता.
ठळक मुद्देया मेळाव्याचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जी.एच.जैन हे होते. धर्मदाय आयुक्तांकडे अधिकृत नोंदणी केल्यानंतर हा मेळावा दुसऱ्यांदा आयोजित केला होता.