नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर सोमवारपासून (दि.०५) सुरळीत सुरू झाल्या असून पहिल्या दोन दिवसातच तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन परीक्षा दिल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली.विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या आॅनलाईन परीक्षा प्रणालीमुळे पहिल्याच दिवशी राज्यभरातून सुमारे ८५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला सामोरे गेले. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या वेळेत परीक्षा देता यावी, अशी लवचिकता ठेवण्यात आली असून विविध शिक्षणक्रमांकरिता ठरवून दिलेल्या दिवसातील निर्धारित पाच तासापैकी कोणत्याही सलग दोन तासात विद्यार्थी ही परीक्षा देवू शकत आहेत. सोमवारी पहिल्याच दिवशी प्रथम सत्रात ७७ टक्के तर, दुसऱ्या सत्रात ८७ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दरम्यान विद्यापीठाला एकूण १० लाख विद्यार्थ्यांची परिक्षा घ्यायची असून एका वेळी ३५ हजारावर विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी ५ तासाचे सत्र ठेवण्यात आल्याचे डॉ. दिनेश भोंडे यांनी सांगितले.करोनाच्या संकटातही परीक्षेला मिळत असलेल्या प्रतिसादातून विद्यार्थ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन दिसत आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सहज सुलभतेने हाताळता येईल, असे तंत्रज्ञान विकसित केल्याने परीक्षार्थी अतीशय सकारात्मकतेने या परीक्षेला सामोरे जात आहेत. प्रा. ई. वायूनंदन, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या