नाशिक : शहरातील रुग्णालयांत कोरोना उपचाराबाबत शासनाच्या निर्देशानुसारच दर आकारले जावे यासाठी संबंधित रुग्णालयांना आता दरपत्रक आणि बेडची स्थितीची माहिती दर्शनी भागात लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. महापालिकेने यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. याशिवाय सर्वच रुग्णालयाांत भेट देऊन मनपाचे कर्मचारी दररोज १० ते २० बिले ताब्यात घेऊन त्याची तपासणी करीत आहेत.शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, अनेक नागरिक खासगी रुग्णालयात उपचारदेखील घेत आहेत. तथापि, काही रुग्णालये जादा दर आकारणी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याची दखल घेऊन महापालिकेने पथक नियुक्त केले आहे. त्याचप्रमाणे शासनाने खासगी रुग्णालयांचे उपचार शुल्क निश्चित केले आहेत. चार हजार, साडेसात हजार आणि नऊ हजार असे हे शुल्क असून, ते अगोदरच घोषित करण्यात आले आहेत. याशिवाय कोरोनाची चाचणी करणाऱ्या खासगी प्रयोगशाळांनादेखील दर निश्चित करून देण्यात आले आहेत.नागरिकांना उपचाराचे शुल्क कळावे आणि रुग्णालयात किती बेड रिक्त आहेत याची तेथे गेल्यानंतर तत्काळ माहिती मिळावी यासाठी रुग्णालयांच्या दर्शनी भागातच दर फलक लावण्याची सक्ती करण्यात आली असून, तसे निर्देश महापालिकेने रुग्णालयांना दिल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली. शहरातील सर्व रुग्णालयांतील दररोजच बिले तपासली जात आहे. या बिलांची तपासणी करून संबंधित रुग्णालांचीदेखील चौकशी केली जाणार आहे.दरम्यान, प्रहार संघटनेचे दत्तू बोडके यांनी शहरातील तीन रुग्णालयांमध्ये बेड््सची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी केलेल्या दूरध्वनीवर अत्यंत टाळाटाळ करण्यात आल्याचा अनुभव आल्याची तक्रार केली आहे.भोजनाच्या खर्चाचादेखील समावेशमहापालिकेने दिलेल्या माहितीनुसार रूटीन वॉर्ड आयसोल्युशनसाठी चार हजार रुपये, आयसीयू वॉर्डासाठी साडेसात हजार रुपय,े तर अतिदक्षता विभागात रुग्णाला व्हेंटिलेटर वापरावा लागल्यास नऊ हजार रुपये दर निश्चित करण्यात आले आहे. यात वैद्यकीय तपासणी शुल्क, सर्व प्रकाराच्या चाचण्या आणि नर्सिंग चार्जेससह रुग्णाच्या नाश्त्याच्या तसेच भोजनाच्या खर्चाचादेखील समावेश आहे.महापालिकेच्या वतीने बेड््सची माहिती आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आली असली तरी काही रुग्णालयांनी त्यासंदर्भात टाळाटाळ केल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने संबंधित दूरध्वनी क्रमांक घेऊन माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
रुग्णालयाच्या बिलांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 11:42 PM
शहरातील रुग्णालयांत कोरोना उपचाराबाबत शासनाच्या निर्देशानुसारच दर आकारले जावे यासाठी संबंधित रुग्णालयांना आता दरपत्रक आणि बेडची स्थितीची माहिती दर्शनी भागात लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. महापालिकेने यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. याशिवाय सर्वच रुग्णालयाांत भेट देऊन मनपाचे कर्मचारी दररोज १० ते २० बिले ताब्यात घेऊन त्याची तपासणी करीत आहेत.
ठळक मुद्देमनपाची कार्यवाही : रुग्णालयांबाहेर दरपत्रक लावणे सक्तीचे