कोरोना विषाणूमुळे गेल्या दहा महिन्यांपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. शासनाने शिथिलता आणल्याने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. येथील विद्यालयात दोन सत्रांत वर्ग भरविण्यात आले होते. पहिल्या सत्रात उच्च माध्यमिक विद्यालयातील १७ विद्यार्थी उपस्थित होते, तर दुसऱ्या सत्रात ९वी व १०वीच्या वर्गाचे नियोजन करण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांनी आज शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये हजेरी लावली. शाळा प्रशासनाकडून योग्य ती सर्व खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्यात आल्या. शाळेतील सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आलेली असून, शाळेचा परिसर हा निर्जंतुकीकरण करण्यात आलेला आहे. शाळेत येताना विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मासचा वापर सक्तीचा होता. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवार (दि.४) जानेवारीपासून वेळापत्रकानुसार दररोज ४० मिनिटांचे इंग्रजी, गणित आणि विज्ञानचे प्रत्येकी चार तासिकांचे नियोजन केले होते.
थर्मलगनद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 8:01 PM