लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा येत्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर परिणाम तर झालाच आहे, शिवाय त्यांच्या वार्षिक परीक्षाही लांबणीवर पडल्या असून, शासनाच्या नवीन आदेशानुसार एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश आहे. जिल्ह्णात जिल्हा परिषदेच्या ३२०० शाळा असून, या शाळांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मार्च महिन्याच्या दुसºया आठवड्यानंतर साधारणत: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी केली जाते. तोंडी परीक्षा, सराव परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षेपूर्व चाचणी घेतली जाते व एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकाच वेळी सर्वच शाळांमध्ये वार्षिक परीक्षा घेतली जाते.वर्षानुवर्षांचा हा प्रघात असून, त्यात खंड पडलेला नाही. यंदा मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका ओळखून पहिल्यांदाच मार्च महिन्यात शाळा बंद करण्याची परिस्थिती ओढवली आहे. १६ मार्चपासून जिल्ह्णातील शाळा बंद करण्यात आल्या असून, शासनाच्या आदेशानुसार तूर्त ३१ मार्चपर्यंत त्या बंद राहतील. या काळात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यास १ एप्रिलपासून शाळा उघडतील. मात्र त्यापूर्वी मार्चच्या दुसºया आठवड्यापासून सुरू होणाºया विद्यार्थ्यांच्या सराव व तोंडी परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. आता या परीक्षा १ एप्रिलनंतर घेतल्या जातील व त्यानंतर दुसºया आठवड्यात वार्षिक परीक्षेचे नियोजन होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. शाळांना सुट्या दिल्यामुळे मार्च महिन्यात पूर्ण करावयाच्या अभ्यासक्रमावरही परिणाम झाला आहे. संपूर्ण शैक्षणिक वर्षात मार्च महिना महत्त्वाचा मानला जात असल्यामुळे शिक्षण विभागाचेही नियोजन कोलमडले आहे. शाळांना सुटी असली तरी, अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी घरूनच अभ्यासाची व परीक्षेची तयारी करून घ्यायची आहे. विद्यार्थ्यांची तोंडी व सराव परीक्षेचा हा कालावधी असला तरी शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाईल. काही प्रमाणात वार्षिक परीक्षा लांबणीवर पडू शकते.- डॉ. वैशाली झनकर, शिक्षणाधिकारी
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या परीक्षा लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:52 PM
नाशिक : कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा येत्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर परिणाम तर झालाच आहे, शिवाय त्यांच्या वार्षिक परीक्षाही लांबणीवर पडल्या असून, शासनाच्या नवीन आदेशानुसार एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्दे अभ्यासक्रम अपूर्ण : सराव परीक्षांवरही परिणाम