शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

अपवाद वगळता नाशिक  जिल्ह्यात शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:58 AM

: मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटनांनी पुकारलेला बंद किरकोळ घटनांचा अपवाद वगळता नाशिक शहर व जिल्ह्यात शांततेत पार पडला़ कार्यकर्त्यांनी गंगापूर धरणात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला प्रतीकात्मक जलसमाधी दिली.

नाशिक : मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटनांनी पुकारलेला बंद किरकोळ घटनांचा अपवाद वगळता नाशिक शहर व जिल्ह्यात शांततेत पार पडला़ कार्यकर्त्यांनी गंगापूर धरणात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला प्रतीकात्मक जलसमाधी दिली. शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ भगूर, कॅम्पमध्ये टायर जाळण्याच्या तर नाशिकरोडला दगडफेकीची किरकोळ घटना घडली़ या कालावधीत अत्यावश्यक सेवा नियमितपणे सुरू होत्या़ दुपारनंतर आंदोलन शिथिल करण्यात आल्याने जनजीवन पूर्वपदावर आले़  आंदोलनात सहभागी करण गायकर, तुषार जगताप, उमेश शिंदे, विजय खर्जुल, मधुकर कासार, मदन गाडे, विकास काळे, वैभव दळवी यांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले होते़ भगूर-देवळाली कॅम्प तसेच त्रिमूर्ती चौक, पंचवटी येथे रास्ता रोको करण्यात आला़ देवळाली व भगूरमध्ये रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला़  बिटको चौकातील मिथिला इमारतीत असलेल्या अंतर्वस्त्रांच्या दुकानावर तसेच परिसरातील बँकेच्या एटीएमवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक करून नुकसान केल्याची घटना घडली़ संभाव्य नुकसान टाळण्यासाठी परिवहन महामंडळाने मंगळवारी रात्रीच सर्व बसेस डेपोमध्ये जमा केल्या होत्या़ शहरातील बहुतांशी शाळांनी बंदच्या पार्श्वभूमीवर सुटी दिली होती, तर काहींनी विद्यार्थ्यांना शाळेतून लवकर सोडून दिले़ मुळातच बंदमुळे शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प होती़  सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमधील कामगारांच्या उपस्थितीवर बंदचा परिणाम आढळून आला़ कॉलेजरोड व गंगापूर रोडवरील दुकानदारांना कार्यकर्त्यांनी गुलाबपुष्प देत बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. दुपारी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा मराठा नेत्यांनी केली़ यानंतर नाशिकमध्येही जनजीवन सुरळीत झाले़ शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली शहरात सुमारे दोन हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदीशहरातील चौका-चौकामध्ये नाकाबंदी तसेच वाहन तपासणी केली जात होती़ शालिमार चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, रामकुंड, गाडगे महाराज पूल, कन्नमवार पूल, जुने नाशिक या परिसरात विशेष दक्षता घेण्यात आली होती. शीघ्रकृती दल, राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांसह दंगल विरोधी वज्र वाहनही सज्ज ठेवण्यात आले होते. यावेळी सहायक आयुक्त बापू बांगर, पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सरकारवाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा