सर्वतीर्थ टाकेद : स्वातंत्र्याचा पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय, प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा प्रदेश), तसेच क्षेत्रीय प्रचार अधिकारी नाशिक यांच्या वतीने ‘भारतीय स्वातंत्र्याचा ७५वा अमृत महोत्सव’निमित्ताने क्रांतिकारकांच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी देशभक्तिपर-समाजप्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी लोककलेच्या परंपरेप्रमाणे गण गौळण त्यानंतर रत्नप्रभा मराडे यांनी गायलेलं ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गीताने व शाहीर उत्तम गायकर यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली, तसेच आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जीवनावरील गीत, वि.दा. सावरकरांचे ‘स्वतंत्रते भगवती’ या गीताबरोबरच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशी विविध गीते गायक शंकर दाभाडे, देविदास साळवे, नामदेव गणाचार्य, दुर्गेश गायकर, प्रशांत भिषे, शिवाजी गायकर, पंढरीनाथ भिषे, ओमकार गायकर यांनी सादर केली.
कार्यक्रमाच्या शेवटी कारगिल युद्धात प्रत्यक्ष लढलेले मेजर विजय कातोरे यांनी कारगिल युद्धाविषयी माहिती दिली. कातोरे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला, तसेच शाहीर उत्तम गायकरांचा व त्यांच्या साथीदारांचा, तसेच सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, ग्रा.पं. सदस्य लता लहामटे, कविता धोंगडे, रतन बांबळे, राम शिंदे, आबाजी बारे, शिवाजी मोंढे, पोलीस पाटील प्रभाकर गायकवाड, राजेंद्र गायकवाड, भाऊराव महाराज धादवड आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आरोग्यसेविका, आशा वर्कर्स व परिसरातील ग्रामस्थ कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
(२४ टाकेद ३) सर्वतीर्थ टाकेद येथे सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी माहिती देताना मेजर विजय कातोरे, समवेत उत्तमराव गायकर, रत्नप्रभा मराडे, राम शिंदे आदी.
240821\1541271624nsk_58_24082021_13.jpg
सर्वतिर्थ टाकेद येथे सांस्कृतिक कार्यक्रमा प्रसंगी माहिती देताना मेजर विजय कातोरे, समवेत उत्तमराव गायकर, रत्नप्रभा मराडे, राम शिंदे आदी.