ठळक मुद्देसूर्यग्रहण : खगोलीय आविष्कार पाहण्यासाठी आबालवृद्धांमध्ये आकर्षण
सिन्नर : ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहण दिसण्यात अडथळे येत असताना काही काळ वातावरणात बदल होताच जिल्ह्याच्या काही भागात काही ठिकाणी सूर्यग्रहण दिसल्याने आनंद झाला, मात्र बराच काळ ढगाळ वातावरणामुळे बघणाऱ्यांचा हिरमोड झाला.ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहण दिसण्यावर सावट होते. बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे पावसाचा शिडकावा झाल्याने सूर्यग्रहण दिसेल अशी अपेक्षा नव्हती, मात्र काही काळ सिन्नरकरांना सूर्यग्रहण अनुभवता आले. यंदा वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण पाहण्यासाठी नागरिकांचा मोठा उत्साह होता, मात्र ढगाळ वातावरणामुळे हिरमोड झाला. सूर्यग्रहण सुरू झाल्यानंतर काही काळ ढगाळ वातावरण बाजूला होताच थोडा वेळ का होईना नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेतला.