संजय पाठक, नाशिक- कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर आता निर्बंध मुक्त वातावरणात होत असलेल्या गणेशोत्सवाचा उत्साह कमी झालेला नाही विसर्जनाच्या दिवशी सुद्धा नाशिक मध्ये सायंकाळी प्रचंड गर्दी झाली आहे.
गणेशोत्सवाचे मुख्य मिरवणूक सुरू असून गोदाकाठी विसर्जनासाठी गर्दी झाली आहे. गेल्या चार पाच दिवसांप्रमाणे आजही सायंकाळी नाशिक शहर, नाशिकरोड,पंचवटी परिसरात पावसाने हजेरी लावली मात्र काही वेळाने पाऊस थांबल्याने गणेश भक्तांचा उत्साह वाढला आहे ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक सुरू असून सायंकाळमुळे आता विद्युत रोषणाईनर देखावे झळाळून निघाले आहेत.
दरम्यान, नाशिक महापालिकेने नदी पात्रात मूर्ती विसर्जनास मनाई केली असून मूर्ती दानाचे आवाहन केले आहे. त्यानुसार 59 हजार 258 मूर्तींचे संकलन झाले आहे.