संमेलन अध्यक्ष डॉ. राजीव पाठक यांच्या हस्ते कविवर्य नारायण सुर्वे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
संमेलनात कवयित्री शुभांगी पाटील यांनी ''आजही हरलोच नाही जगण्याची उम्मीद'', ‘साजना सांगते शपथ घेऊन अशी’, किरण सोनार यांनी ''जगणे झाले कठीण'' आणि ‘राहून गेले’, अमोल चिने पाटील यांनी ''फास'', ''माय'', प्रमोद घोरपडे यांनी ‘बुधवार पेठेतील माय’, सत्यजीत पाटील यांनी ‘योगिनी महामाये’, रविकांत शार्दूल यांनी ‘काव्य चोरी’, ‘बैठकीची लावणी’, ‘मनमोहना..’ बालकवी पीयूष गांगुर्डे याने ‘लाॅकडाऊननंतरचे जनजीवन’ आणि ‘माय बाप’ कविता सादर केली. डॉ. राजीव पाठक यांनी अध्यक्षीय भाषणात कवितांचे रसग्रहण केले. सूत्रसंचालन करून आभार रविकांत शार्दूल यांनी मानले.