याप्रसंगी शिक्षणाचे बाजारीकरण विरोधी मंचाचे निमंत्रक डॉ. मिलिंद वाघ, डीवायएफआयचे संस्थापक राज्य उपाध्यक्ष सुनील मालुसरे, जिल्हा सरचिटणीस कैलास बलसाने, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षा सुनंदा जरांडे, हुतात्मा फाउंडेशनचे मिलिंद बोंदार्डे, हेमंत तुपे, मंदार हुदलीकर, जितेंद्र निकम, मुकुंद रानडे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वक्तृत्व स्पर्धेत दीपाली मोतीलाल महाजन प्रथम, पूर्वा प्रशांत कुलकर्णी द्वितीय, तर तृतीय क्रमांक विभागून अमृता कैलास पवार व प्रियांका सोपान सोनवणे यांना देण्यात आला. निबंध स्पर्धेत खान जस्सीम रियाजुद्दिन प्रथम, अश्विनी वैभव सोनवणे द्वितीय, तर सार्थक सतीश साळुंके तृतीय आला.
पोस्टर स्पर्धेत स्वरूप किरण भोसलेने प्रथम, श्रावणी अण्णा घुगेने द्वितीय, तर शेख मो गौसने तिसरा क्रमांक पटकाविला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी
रेणुका अजय सायखेडकर, तसेच राजेश अक्कर, अजय पाटील, ताल्हा शेख यांनीही क्रांती गिते सादर केली.
कैलास बलसाने, तसेच परीक्षक प्रा. प्रकाश चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धा संयोजक मुकुंद रानडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
छायाचित्र आर फोटोवर २१ डीवायएफआय...