लासलगाव : अडत प्रश्नामुळे लासलगाव येथील मर्चंटस असोशिएशनचे व्यापारी लिलावात सहभागी होणार नसल्यानेलासलगाव कृषी उत्पन्न बाजार समतिीतील शेतीमालाचे लिलाव येत्या सोमवार पासुन बेमुदत बंद राहणार असल्याची माहिती लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समतिीचे सभापती नानासाहेब पाटील व सचिव बी.वार.होळकर यांनी दिली.महाराष्ट्र राज्य पणन संचालक डॉ सुभाष माने यांनी कुषी उत्पन्न बाजार समतिीच्या आवारावरील होणार्या शेतीमाल विक्र ीकराता कोणत्याही परिस्थितीत अडत वसुल करू नये असे परिपत्रक दि.20 डिसेंबर रोजी जारी केले आहे.त्यामुळे आता शेतकरी वर्गाची आडत देण्यापासुन मुक्ती मिळणार असल्याने करोडो रु पये शेतीमालाचे विक्र ी चा खर्च वाचणार आहे.राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समतिीतील होणार्या शेतीमाल खरेदी विक्र ी होत असतांनाही अडते म्हणजे कमीशन एजंट तीन ते दहा टक्के दरम्यान अडत घेत असतात .या करीता बाजार समतिीच्या वतीने अनुज्ञप्तीधारक अडते परवाना धारण करु न ही अडत वसुल करीत आहेत. पणन संचालक सुभाष माने यांनी सर्व जिल्हा उपनिबंधक व बाजार समतिीचे कार्यालयांना हे परिपत्रक जारी केले असुन आता या पणन संचालकाच्या परिपत्रकाने शेतकरी वर्गास शेतीमालाचे विक्र ी असतांना ही अडत भरण्यासाठी होणारा आर्थीक भुर्दंड वाचणार.आहे. राज्यात 305 बाजार समतिीतील ही अडत पध्दती बंद होण्याची शक्?यता आहे. परंतु या निर्णयाला व्यापारी संघटनेचा तीव्र विरोध दर्शविला जात आहे शेजारच्या राज्यातील बाजार समतिीत अडत वसुल केली जात नाही. या मुद्द्यावर नासिक जिल्ह्यÞातील कृषी उत्पन्न बाजार समतिीचे शेतीमालाचे लिलाव बेमुदत बंद राहण्याची भिती वास्तवात आली आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समतिीसह नासिक जिल्ह्यÞातील कृषी उत्पन्न बाजार समतिीच्या वतीने पणन मंडळाचे संचालक डॉ सुभाष माने यांच्या परिपत्रकानुसार अंमलबजावणी करावी असे पत्र मर्चंटस असोशिएशनला दिले . लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समतिीचे सभापती नानासाहेब पाटील व सचिव बी.वाय होळकर यांनी लिलावाची माहीती दिली.व्यापाऱ्यांची बैठकयेवला शासनाने बाजार समतिीत व्यापार्यांनी आडत घेण्यास बंदी घातल्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ येवला मार्केट वर भाजीपाला,भुसार मालासह,कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कांदा व्यापारी नंदकुमार अट्टल यांनी दिली.पिंपळगाव येथे अडत प्रश्नी व्यापार्याच्या बैठकीसाठी येवल्यातून नऊ व्यापारी उपस्थित होते. नंदकुमार अट्टल,भारत समिदडया,रामेश्वर कलंत्री,सुभाष समिदडया,उमेश अट्टल,सतीश समिदडया,योगेश सोनी,विलास गाढे,साहेबराव पाटील, भिका एडाईत आदि व्यापारी या बैठकीहून आल्यानंतर येवल्यात अन्य व्यापार्याशी चर्चा केली. दोन-ते सहा टक्के आडतचे पैसे पाहताना मोठे नुकसान होणार आहेत .असा निर्णय न लादून योग्य तो निर्णय शेतकरी हितासाठी घेवून शेतकर्यांना न्याय द्यावा.पुणे पणन संघाचे माजी संचालक सुभाष निकम यांनी या प्रकरणी उपोषणाचा इशारा दिला आहे.(वार्ताहर)
बहिष्कार : लिलावात सहभागी न होण्याचा निर्णयआडतप्रश्नी व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद
By admin | Published: December 22, 2014 12:31 AM