ठळक मुद्देतीन महिन्यांपासून व्यवसाय व्यवहार उद्योग रोजगार बंद
सिन्नर: लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून व्यवसाय व्यवहार उद्योग रोजगार बंद आहे. सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. असे असूनही ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज देयके देण्यात आली आहेत. ही देयके माफ करावीत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली. तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी मागणीचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे, वीज महावितरण अभियंता सचिन पवार यांना दिले.शहराध्यक्ष दौलत धनगर, संदीप लोंढे, अर्जुन घोरपडे, विठ्ठल वाघ, खंडू सांगळे, शिवाजी गुंजाळ, गणपत घोटेकर, भामाबाई पवार, रंगनाथ वाजे, रामनाथ आव्हाड, सदाशिव कोकाटे, उमाजी सांगळे, वामन पगार, दत्तू खुळे आदी उपस्थित होते.