नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. याठिकाणी बाधित व संशयित रुग्णांच्या विलगीकरणाची सोय करत त्यांच्यावर उपचार करण्यात येतात.गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यात कार्यरत असलेल्या या कोविड केअर सेंटरमधील असुविधांबाबत आता मोठ्या प्रमाणावर तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यातच सटाणा तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथील दाखल एका रुग्णाने अव्यवस्थेचे स्टिंग आॅपरेशन करत व्हिडिओ व्हायरल केल्याने विदारकवास्तव समोर आले. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरचा आॅन दी स्पॉट हालहवाल जाणून घेतला तेव्हा काही अपवादवगळता सेंटरमधील असुविधांबाबत ओरड कायम असल्याचे दिसून आले.त्र्यंबकेश्वरला रुग्णांप्रति दूरस्थ भावत्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरु कुलात शासनाने कोविड केअर सेंटर उभारले आहे. याठिकाणी बाधित रुग्णांवर योग्य औषधोपचार केले जात असले तरी रुग्णांप्रति दूरस्थ भाव दाखविला जातो. त्यामुळे रुग्णांमध्ये अस्पृश्यतेची भावना निर्माण होते. त्यामुळे रु ग्णाचे मनोधैर्य वाढण्याऐवजी त्यांचे खच्चीकरणच होते.उपचार घेण्यासाठी आलेल्या रु ग्णांसाठी गरम पाण्याची सोय नाही. प्रत्यक्षात याठिकाणी फलक मात्र गरम पाण्याचा लावलेला दिसून येतो. आरोग्य तपासणी वेळेवर होत आहे. सेंटर श्री स्वामी समर्थ केंद्रात असल्याने साफसफाई, स्वच्छतेस विशेष महत्त्व दिले जात आहे. भोजनाच्या दर्जाबाबत रुग्ण फारसे समाधानी दिसले नाहीत. नगर परिषदेकडून मात्र याठिकाणी तसेच शहरात स्वच्छतेबाबत निर्जंतुकी करणाबाबत विशेष दक्षता घेतली जात नसल्याचे चित्र आहे.
बिंग फुटले तरी निर्ढावलेपण कायमसटाणा : अजमीर सौंदाणे येथील कोविड केअर सेंटर सुरु वातीपासूनच वादग्रस्तच ठरल्याचे बागलाणवासीयांना अनुभवयाला मिळाले. कधी प्यायला पाणी नाही तर कधी शौचास जाण्यासाठी पाणी नाही. डॉक्टर म्हणतात गरम पाणी पिल्याने कोरोना जातो. मात्र या सेंटरमध्ये गरम पाणी मिळत नाही. कोणी म्हणतो, आम्ही बाधित आहोत तर आमच्यावर उपचार का करत नाहीत तर कोणी म्हणतो, कोरोना झाल्यावर अंडी खा.. परंतु येथे अंडी काय कैद खाण्यापेक्षाही निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याच्यातक्र ारी येत असताना अचानक एका रु ग्णानेच कोविड सेंटरमधील अनागोंदी कारभाराचे चित्रीकरण करून बिंग फोडले. या कोविड सेंटरची अवस्था काही सुधारलेली नाही. याठिकाणी बाधितांची यंत्रणेमार्फतच हेळसांड होत असल्याचे बघायला मिळाले.