येवला (योगेंद्र वाघ) : तालुक्यात शासन दप्तरी स्थलांतरित मजुरांची नोंदच नसल्याने तालुक्यात निवारागृह नाही. मात्र, वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या व्यवसायानिमित्त शहरासह तालुक्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, गुजराथ, पंजाब, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान आदी राज्यातून कष्टकरी-मजूर आलेले आहेत.कोरोनाची चाहूल लागताच बहुतांशी कष्टकरी, मजूर आपापल्या गावी परतले. परंतु लॉकडाउन व संचारबंदीत अडकून राहिलेल्या कष्टकरी, मजुरांना स्थानिक पातळीवर शहरातील किराणा व्यापारी असोसिएशन, माणुसकी फाउण्डेशन,सोशल मीडिया फोरम, वीर सावरकर बहुद्देशीय संस्थांसह अनेक स्वयंसेवी संस्थांकडून अन्नधान्य, किराणा, भोजन वाटप केले जात आहे.शहरालगत बाभूळगाव येथे संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारण्यात आला असून या कक्षात सद्य:स्थितीला ७९ व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. तर कोविड केअर सेंटरमध्ये २ रुग्ण दाखल आहेत. विलगीकरण कक्षासाठी १ वैद्यकीय अधिकारी व ४ शिक्षक नेमण्यात आले आहेत. या कक्षात दाखल असणाºया व्यक्तींना सकाळी चहा-नास्ता, दुपारी व रात्री जेवण दिले जाते. विलगीकरण कक्षाची स्वच्छता, जंतुनाशक फवारणी, विलगीकरण कक्षासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाºयांची सुरक्षा हे प्रश्न आहेत, ते कोणी सोडवावे हा प्रश्नच आहे.शहरात उपजिल्हा रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. या रूग्णालयातील एक ३६ वर्षीय महिला आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित सिद्ध झाल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, काही कर्मचाºयांनी स्वत:ला होम क्वॉरण्टाईन करून घेतले आहे. असे असले तरी उपजिल्हा रूग्णालय सुरू असून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.एकूण स्थानिक आरोग्य यंत्रणेवर आपत्कालीन परिस्थितीचा मोठा ताण पडल्याचे चित्र आहे. अपुºया कर्मचाºयांच्या जोरावर आरोग्य यंत्रणेची उपाययोजनेसाठी मोठी कसरत सुरू आहे. विशेष म्हणजे येवल्यातील १०८ क्र मांक सुविधा देणारी रुग्णवाहिका बंद आहे.जिल्हास्तरावरून येथील आरोग्य यंत्रणेला आवश्यक एन-९५ मास्क, पीपीइ कीट, ग्लोज, सॅनिटायझर आदी साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने स्थानिक स्तरावर खरेदी करावी लागत आहे. त्यातल्या त्यात ग्रँडही नाही.यंत्रणेत समन्वयाचा अभाव असून येवल्यातील आरोग्य यंत्रणाच प्रथम प्राधान्याने सक्षम करणे अत्यावश्यक बनले आहे.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य यंत्रणेची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 9:39 PM