नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाºया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. असंख्य खड्डे व खोलवर गेलेल्या साइडपट्ट्यांमुळे हा रस्ता गेल्या काही दिवसांपासून अपघातप्रवण बनला आहे. अनेकांना जखमी करणाºया या अरु ंद रस्त्याने प्रवास करणे धोकेदायक ठरत आहे.निफाड व सिन्नर या दोन तालुक्यांना जोडणारा जवळचा रस्ता म्हणून सिन्नर-नायगाव-सायखेडा या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या रस्त्याची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे. नायगाव ते सिन्नर या तेरा किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सध्या मोजता येणार नाही एवढे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही.नायगाव खोºयाला जोडणाºया सर्व रस्त्यांपेक्षा हा रस्ता महत्त्वाचा असतानाही सर्वांत अरु ंद रस्ता आहे. अत्यंत बारीक असलेल्या संपूर्ण रस्त्याच्या साइडपट्ट्या फूट-दोन फूट खोलवर गेल्या आहेत. त्यामुळे दोन वाहने पास होताना साइड देण्यावरून वाहनचालकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकीस्वारांची विशेषत: रात्रीच्या वेळी तारांबळ होत आहे.जायगाव कपोता नाला, गिते फाटा, गामणे वस्ती, रानबाई, महादेव मंदिर, जायगाव घाट, माळेगाव फाटा व मापारवाडी दाट झाडी आदी ठिकाणी हा रस्ता अपघातप्रवण बनला आहे. तर संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही साइडपट्ट्या खोलवर गेल्याने संपूर्ण रस्ता रूंदीकरण व डांबरीकरण करणे गरजेचे आहे.वर्षभरापूर्वीच नूतनीकरण करूनही खड्डे कायमनायगाव - सिन्नर या रस्त्याच्या काही किलोमीटर अंतराचे वर्षभरापूर्वीच नूतनीकरण करण्यात आले आहे. हा रस्ताही बºयाच ठिकाणी खराब झाला आहे. हे काम करताना या रस्त्यांच्या साइडपट्ट्यांची दुरु स्ती करणे गरजेचे असतानाही ते झाले नाही. दर्जाहीन काम झालेल्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा दर्जेदार काम होण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.गेल्या काही दिवसांपासून एकलहरे येथून राखेची वाहतूक करणाºया तसेच शिंदे टोलनाका चुकविणाºया ओव्हर लोड वाहनांची या मार्गाने गर्दी वाढली आहे. रस्ता अरूंद असल्यामुळे रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.